🌟राज्यातील प्रत्येक मोठ्या जिल्ह्याला दोन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक - महसूल मंत्री बावनकुळे


🌟राज्य शासनाच्या अनेक लोकाभिमुख योजना सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी🌟 

नागपूर :- वार्ताहर राज्य शासनाच्या अनेक लोकाभिमुख योजना या सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आहेत जोपर्यंत प्रत्येक आदिवासी पाडे,वस्ती येथील वंचित लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचणार नाहीत तोपर्यंत शासकीय योजनांनाही अर्थ उरणार नाही पारधी समाजारसारख्या उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी महसूल यंत्रणा, आदिवसी विभाग, सामाजिक न्याय विभाग यांनी जबाबदारीने अशा वस्त्यांना भेटी देऊन त्यांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे निर्देश महसूलमंमत्री चंद्रशेकर बावनकुळे यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात पारधी समाज प्रमाणपत्र व महसूल प्रशासनाशी संबंधित विविध प्रश्नांवर त्यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, आदिवासी विकास आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे व जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी या बैठकीस उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या