🚉 संक्रांतीच्या सणानिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्या सोडण्यात येणार 🚉
नांदेड (दि.05 जानेवारी 2024) : नांदेड दक्षिण मध्य विभागाच्या वतीने संक्रांतीच्या सणानिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेवून प्रवाशांच्या सोयीसाठी नांदेड-काकिनाडा-नांदेड विशेष रेल्वे गाड्या चालविण्याची घोषणा केली असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क विभागाने दिली आहे.
गाडी क्रमांक 07487 नांदेड-काकिनाडा ही गाडी 6 आणि 13 जानेवारी (सोमवारी) रोजी दुपारी 02.25 वाजता नांदेड येथून सुटेल व मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, सिकंदराबाद, वारंगल, रायानपडू, राजमुंद्री, आणि सामलकोट मार्गे काकिनाडा येथे दुसर्या दिवशी (मंगळवारी) सकाळी 08.10 वाजता पोहचेल. तर गाडी क्रमांक 07488 काकिनाडा -नांदेड ही गाडी 7 आणि 14 जानेवारी (मंगळवारी) रोजी सायंकाळी 18.10 वाजता काकिनाडा येथून सुटेल व सामलकोट, राजमुंद्री, रायानपडू वारंगल, सिकंदराबाद, निजामाबाद, बासर धर्माबाद, आणि मुदखेड मार्गे नांदेड येथे दुसर्या दिवशी (बुधवारी) दुपारी 3.10 पोहचेल. या गाडीत एकूण 22 डब्बे असतील ज्यात जनरल, स्लीपर, वातानुकुलीत डब्यांचा समावेश आहे.
दरम्यान, प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा नजीकच्या आरक्षण केंद्रावरून तिकीट आरक्षण करावे. तसेच, प्रवासादरम्यान सुरक्षितता आणि रेल्वेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क विभागाने केले आहे.......
0 टिप्पण्या