🌟पुर्णा येथील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न.....!


🌟या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ.विजय पवार व डॉ.सोमनाथ गुंजकर यांनी भूमिका पार पाडली🌟

पुर्णा : पुर्णा तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय पूर्णा (निवडणूक विभाग) व श्री गुरु बुद्धिस्वामी  महाविदयालय, पूर्णाच्या वतीने 25 जानेवारी, 2025 मतदार दिनाच्या अनुषंगाने तालुक्यातील शाळा व महाविद्यालयामध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार  25 जानेवारी 2025 रोजी 15 वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येणार आहे. या वर्षी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यासाठीची  थीम "Nothing like voting. I vote for sure" "वोट जैसा कुछ नही, वोट जरूर डालेंगे हम" अशी आहे या अनुषंगाने प्राथमिक/माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयामध्ये शपथ घेण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम घेण्यात आले.श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. गजानन कुरुंदकर, डॉ. शिवसांब कापसे,श्री शिंदे नायब तहसीलदार पूर्णा, श्री नामदेव टीमके शिक्षण विस्तार अधिकारी पूर्णा,श्री ढाले ए. ए.विषय तज्ञ,श्री व्यंकटेश जजरवार ,श्री केशव सांडले यांची प्रमुख उपस्थिती होती.महाविद्यालयाचे मतदान जनजागृतीचे समन्वयक डॉ.शेटे एस. बी. यांनी प्रास्ताविक केले. या वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक गट व माध्यमिक गटातील एकूण 12 विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या वक्तृत्व स्पर्धेत खालील विषय होते.

आपल्या देशात लोकशाही रुजली आहे का? म्हणून मी मताधिकार बजावतो / बजावते,लोकशाही आणि तरुण मतदार,व्यवस्था बदलाचा राजमार्ग मताधिकार, मताधिकाराची सक्ती करावी का?  सक्षम लोकशाहीची पहिली पायरी मतदार नोंदणी. विषय ठेवण्यात आले होते.सर्व विषयावर या विदयार्थ्यांनी स्पर्धेतून आपले विचार व्यक्त केले.या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढण्यात आले.निवडणूक विभाग तहसील कार्यालय पूर्णा यांची कार्यक्रम घेण्याची भूमिका श्री ढाले ए. ए.यांनी स्पष्ट केली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. विजय पवार व डॉ. सोमनाथ गुंजकर यांनी भूमिका पार पाडली.यावेळी सर्व प्राध्यापक व शिक्षेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या