🌟परराज्यातील महिलांनी देखील उचलला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ : धक्कादायक माहिती आली समोर....!


🌟महाराष्ट्र राज्याबाहेरील परराज्यातील तब्बल ११७१ अर्ज लाडकी बहीण योजनेत दाखल🌟

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांतर्गत आतापर्यंत शासनाकडून ७ हप्त्यांची रक्कम मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाली आहे. मात्र ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर लागू करण्यात आलेली ही योजना असंख्य बोगस अर्जामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. 

अशात परराज्यातील महिलांनाही या योजनेचा लाभ मिळाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून २ कोटींहून अधिक महिलांना लाभ देण्यात येत आहे. लातूर आणि सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचे दाखवून बोगस लॉगिन आयडी तयार करत परराज्यातील तब्बल ११७१ अर्ज लाडकी बहीण योजनेत दाखल झाले. या अर्जाची छाननी केली असता ज्यांनी अंगणवाडी सेविका असल्याचे दाखवून अर्ज केले, ते उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील असल्याचे तपासात समोर आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या