🌟पुर्णा शहरात आयोजित डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी व्याख्यानमालेत बोलताना ते म्हणाले🌟
पुर्णा (दि.०८ जानेवारी २०२५) आयुष्यात आपणांस आनंदी राहायचे असेल तर आपल्या सभोवतालची नाती आपण जपली पाहिजे ही नाती गोती सृदढ झाली तर निश्चितच आपणांस आनंद मिळेल असे प्रतिपादन सुहास लंके (छत्रपती संभाजी नगर) यांनी केले
येथील अभिनव विद्या विहार प्रशालेच्या प्रांगणात लोककल्याण नागरी सहकारी पतसंस्था व मराठवाडा युवक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी व्याख्यानमाला व स्व. प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमालेत " नाती गोती" याविषयावर ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी लोककल्याण पतसंस्थेचे अध्यक्ष श्री वसंतराव कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री डाॅ.विनयजी वाघमारे हे होते.प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व मान्यवरांचे स्वागत करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
यावेळी श्री दिपक डहाळे यांनी वैयक्तीक पद्याचे गायन केले तर पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक विश्वनाथ भायेकर यांनी केले कुटुंबात नात्या गोत्यांचे महत्त्व विशद करताना श्री लंके म्हणाले की नात्यांना जीवनात अन्यन साधारण महत्त्व आहे. या नात्यानां आपण जपले पाहिजे आपले मन हे मुंबईतल्या नाल्या प्रमाणे तुबंले आहे..हे तुबंलेले मन मोकळे करण्यासाठी आपल्या जीवनात नातीगोती खुप महत्वाची आहेत या मुळे कोणत्याही संकटाचा सामना करण्याचे आपल्यात बळ येते व संकटे येणार नाही., त्यासाठी आपल्या कुटुंबातील नात्यांमध्ये संवाद साधून मानवी जीवन सुखकर केले पाहिजे , आजच्या काळात पैसा, सुबत्ता भरपुर आहे पण संवाद नाही ,त्यासाठी नात्यातील प्रत्येक व्यक्तीस महत्त्व देऊन त्याचांवर प्रेम करा " चहा"चे सुंदर उदाहरण देत चहाला जसे पाणी, दुध, चहापत्ती, साखर, मसाला, उर्जा कशी अवश्यक आहे त्या प्रमाणेच भावु, बहीन, अत्या मामा, वहीनी, मित्र, आई, वडील यांची नाती गोती कशी सांभाळायची याचे उत्तम उदाहरण देऊन त्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
कार्यक्रमाचे सुञसंचालन श्री प्रा.बालाजी शिंदे यानी केले तर आभारप्रदर्शन श्री विलास कदम यानीं केले कार्यक्रमाचा शेवट मधुकर जोशी यांचे वन्दे मातरम् गायनाने झाला या कार्यक्रमात शातांबाई दत्तात्रेय वाघमारे, डॉ.श्रद्धा विनय वाघमारे , मराठवाडा युवक विकास मंडळाचे विभागीय उपाध्यक्ष व्यंकटेश कमळु आदि मांन्यवर उपस्थित होते......
0 टिप्पण्या