🌟सुनीता विल्यम्स या जून 2024 पासून ‘आयएसएस’वर आहेत🌟
✍️ मोहन चौकेकर
2025 या नव्या वर्षाचे अनेकांनी जल्लोषात व आपापल्या पद्धतीने स्वागत केले. अवकाशातही नवीन वर्षाचे स्वागत उत्साहाने करण्यात आलं आहे. भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या टीमने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नवीन वर्षाचे हे स्वागत केले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हे दर दहा मिनिटांनी पृथ्वीभोवती फिरते. त्यामुळे अंतराळ स्थानकावरील सुनीता आणि त्यांचे सहकारी हे 16 सूर्योदय आणि 16 सूर्यास्त पाहू शकले.
सुनीता विल्यम्स या जून 2024 पासून ‘आयएसएस’वर आहेत. हे मिशन फक्त आठ दिवसांचे होते. परंतु सुनीता आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर अजूनही अवकाशातच आहेत. सुनीता विल्यम्स यांच्यासोबत स्थानकातील सध्याच्या रहिवासी पथकामधील अॅलेक्सी ओव्हचिनिन, इव्हान वॅगनर, डॉन पेटिट, अलेक्झांडर गोर्बुनोव्ह आणि निक हेग हे आहेत. ‘आयएसएस’ने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर फोटो पोस्ट करत लिहिलंय, ‘2024 हे वर्ष आज संपतंय. एक्स्पेडिशन 72 क्रू हे 16 सूर्योदय आणि सूर्यास्त पाहात नवीन वर्षाची सुरुवात करतील.’ विल्यम्स आणि बुच विल्मोर हे आता मार्चमध्ये परतण्याची अपेक्षा आहे. ते फेब्रुवारी 2025 मध्ये परतणार होते. परंतु स्पेस एक्स क्रू-10 मोहिमेत विलंब झाल्यामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. भारतीय मूळ असलेल्या सुनीता विल्यम्स आणि तिचे सहकारी बुच विल्मोर यांनी 5 जून 2024 रोजी बोईंग कंपनीच्या स्टारलाईन स्पेसक्राफ्टच्या पहिल्या क्रू फ्लाईटमध्ये स्वार होऊन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक गाठले होते. 8 दिवसांच्या मिशनवर गेलेल्या स्टारलायनर यानात बिघाड झाल्याने दोघे अंतराळवीर यांच्या पृथ्वी वापसीला मार्च 2025 पर्यंत वेळ लागू शकतो, असं म्हटलं जातंय. एवढे महिने अंतराळात राहून व अनेक त्रास सहन करुनही सुनीता विल्यम्स यांचं अंतराळ प्रेम जराही कमी झालेलं नाही. “अंतराळत मला आनंद मिळतो. मला अंतराळात राहायला आवडतं,” असं सुनिता विल्यम्स म्हणाल्या.....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या