🌟परभणी जिल्ह्यातल्या अनेक दिग्गजांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला जाहीर प्रवेश...!


🌟 राष्ट्रवादीत करणाऱ्यांमध्ये सुरेश नागरे,नानासाहेब राऊत,संजय साडेगावकर यांचा समावेश : राजकीय वर्तूळात खळबळ🌟

 परभणी (दि.१८ जानेवारी २०२५) : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर जिंतूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे प्रदेश सचिव सुरेश नागरे,काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत,शिवसेना उबाठा गटाचे माजी जिल्हा प्रमुख संजय साडेगांवकर,संत भगवानबाबा युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव बुधवंत, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब घुगे,लिंबाजीराव पुंजारे,अविनाश काळे यांच्यासह जवळपास १७ आजी-माजी सदस्यांनी आज शनिवार दि.१८ जानेवारी रोजी शिर्डीत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

           आज पक्षप्रवेश केलेल्या व प्रसारमाध्यमांना दिलेल्या यादीत गणेशराव मुंढे, राजेंद्र नागरे, प्रकाशराव देशमुख, केशवराव बुधवंत, अ‍ॅड. सुनील बुधवंत, विनायकराव आडे, बाज मोहम्मद फैज मोहम्मद, उस्मान खान, रामजी घुगे, पंडीतराव घोलप, राजेश चव्हाण, गजानन वराड, अनंतराव कोरडे, केशवराव घुले, सौ. कमल लोखंडे, भागवत जोगदंड, अमित राठोड, गजानन घुगे, तसेहीन जाफरमियाँ देशमुख, रावसाहेब मुसळे, सुधाकर नागरे, कुबेर हुलगुंडे, भास्करराव नागरे, सुधाकरराव घुगे, भारत घुगे, संजय घुले, उमेश दराडे, श्रीनिवास घुगे, पवन भालेराव उध्दव दराडे, प्रभाकर आघाव, रमेश राख, अनिल लांडगे, जगन्नाथ काळे, पंढरी डोईफोडे, मोबीन कुरेशी, उस्मान पठाण, रामेश्‍वर राठोड, सोहेल अहमद अब्दुल कदीर, जाबेर मुल्ला, वसीद मजीद पठाण, सय्यद हाशम सय्यद अली, रामप्रसाद माघाडे, अर्जून वजीर, रावसाहेब खंदारे, लखन कुर्‍हे, गणेश काकडे, नितीन वाणी, दिलीप माघाडे, रमेशराव काठोळे, विश्‍वनाथ गनगे, मुजाहेद कादरी, शाकेर पठाण, पंढरीनाथ बिरगड, संतोष आंधळे, नवनाथ घुगे, सुभाषराव घुगे, गुबाल चौधरी, वाजेद कुरेशी, बद्रोद्दीन काजी, रहेमत अली, शिवशंकर तमशेटे, सलमान इनामदार, नानासाहेब निकाळजे, बाबासाहेब म्हेत्रे व सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुधाकर कुर्‍हे यांची नावे प्रवेशकर्ते म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.

           दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघांतर्गत हे नेते व माजी सदस्य हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संपर्कात होते. पक्षाध्यक्ष पवार यांनी हिरवी झेंडी दिल्यानंतर या नेते व माजी सदस्यांनी शनिवारी पक्षाच्या शिर्डी येथील अधिवेशनात पक्षप्रवेश केला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री  अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राज्यसभा खासदार श्रीमती सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, मंत्रीमहोदय, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या