🌟स्व.भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी व दिवंगत लोकनेते विजय वाकोडे कुटुंबियांची घेणार सांत्वनपर भेट🌟
परभणी (दि.११ जानेवारी २०२५) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे ह्या उद्या रविवार दि.१२ जानेवारी २०२५ रोजी परभणी दौर्यावर येणार असून स्व.भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी व आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ लोकनेते नेते स्व.विजय वाकोडे यांच्या कुटूंबियांची त्या सांत्वनपर भेट घेणार आहेत.
खासदार सुळे यांचे बुलढाणा येथून दुपारी ०३.०० वाजता मोटारीने परभणीत आगमन होणार असून दुपारी ०३.१५ वाजता शहरातील जिंतूर रोडवरील महात्मा फुले हायस्कूल येथे त्या भेट देणार आहेत. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड.विजयराव गव्हाणे व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. दुपारी ०३.३० वाजता शहरातील रविराज पार्क येथे सोमवंशी कुटुंबियांची तर दुपारी ०३.४५ वाजता राहुल नगरात वाकोडे कुटुंबियांची त्या भेट घेणार आहेत दुपारी ०४.०० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून धरणे आंदोलनस्थळी भेट देवून उपोषणकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर खासदार सुळे ह्या सायंकाळी ०४.४५ वाजता छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करणार आहेत.......
0 टिप्पण्या