🌟डॉक्टरांनी त्यांना धावपळ टाळून विश्रांतीचा दिला सल्ला : पुर्व नियोजित ४ दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द🌟
मुंबई :- राज्यातील जेष्ठ राजकारणी तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती काल शनिवार दि.२५ जानेवारी रोजी अचानक बिघडल्याने डॉक्टरांनी त्यांना धावपळ टाळून तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला असल्यामुळे शरद पवार यांचे पुढील ४ दिवसांतील सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आलेत.
राज्यातील विविधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर शरद पवार यांनी राज्यात जनसंपर्क दौऱ्यांवर जास्त भर दिला आहे पवार सातत्याने राज्यभरात दौरे काढून पक्ष कार्यकर्त्यांसह जनसमान्यांशी संवाद साधत आहेत या माध्यमातून ते आपल्या पक्षाची पाळेमुळे रोवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे शरद पवारांची प्रकृती बिघडल्याची माहिती पुढे आली आहे यासंबंधीच्या माहितीनुसार, शरद पवारांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना धावपळ टाळून विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे......
0 टिप्पण्या