🌟मराठी पत्रकार परिषदेची संलग्न असलेल्या बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाची सर्वसमावेशक कार्यकारिणी घोषीत.....!


🌟मोताळा ते मेहकर,संग्रामपूरपासून ते सिंदखेडराजापर्यंत सर्वांचा सहभाग🌟 

   ✍️ मोहन चौकेकर 

बुलढाणा (दि.18 जानेवारी 2025) :- सर्वात जुनी, 83 वर्षांचा इतिहास तसेच पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेशी संलग्नीत बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाची सर्व समावेशक विस्तारित जिल्हा कार्यकारिणी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या आदेशाने तसेच विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलींद आष्टीवकर, सरचिटणिस सुरेश नाईकवाडे, डिजिटल मिडीया परिषदेचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनात अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी इतर पदाधिकार्‍यांच्या सर्वसंमतीने घोषीत केली असून यात संग्रामपूर ते सिंदखेड राजा तसेच मेहकर ते मोताळा अशा सर्व ठिकाणच्या जेष्ठ-श्रेष्ठ तथा कार्यशिल पत्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. सदर कार्यकारिणी मध्ये आणखी काही इच्छुकांचा समावेश करून अंतिम विस्तारित कार्यकारिणी लवकरच घोषीत केली जाईल, असे जिल्हा सरचिटणिस कासिम शेख यांनी कळविले आहे.

बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारिणीचे मार्गदर्शक म्हणून विश्वंभर वाघमारे, बापूसाहेब मोरे (बुलढाणा), राजेश राजोरे (खामगाव), अभिमन्यु भगत (जळगाव जामोद), सुभाष लहाने (बुलढाणा), रमेश उमाळकर (मलकापूर), राजेश देशमाने, सुरेश देवकर(बुलढाणा), सतीषअप्पा दुडे (खामगाव), राजेंद्र टिकार, एस.पी.हिवाळे आदी मान्यवर राहतील. तर बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे सन्माननिय निमंत्रक म्हणून मुकुंद जोशी, नितिन शिरसाट, पृथ्वीराज चव्हाण (बुलढाणा), केशव घाटे (संग्रामपूर), अशरफ पटेल (देऊळगाव राजा), अनिल पाटील (जळगाव जामोद), शाम तायडे (जळगाव जामोद), हरी गोसावी (मलकापूर), फिरोज शाह (मेहकर), रामदास कहाळे (सिंदखेडराजा )आदींची नावे निश्चित करण्यात आली आहे.

बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार परिषदेच्या प्रदेश प्रतिनिधी पदी  युवराज वाघ आणि गणेश निकम या दोन जणांची निवड करण्यात आली असून पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या समन्वयक  पदी राजेश डिडोळकर (बुलढाणा) तर सहसमन्वयक पदी सुरेश पेठकर (नांदुरा) कार्यरत राहतील. तर पत्रकार हल्ला विरोधीकृती समितीच्या निमंत्रक पदाची जबाबदारी जेष्ठ पत्रकार विश्वास पाटील (मोताळा) यांच्याकडे देण्यात आली आहे. याच श्रृंखलेत पत्रकार हल्ला विरोधी सत्यशोधन समिती जेष्ठ पत्रकार विजय देशमुख (बुलढाणा) यांच्या नेतृत्वात काम करेल.

बुलढाणा जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार पाहता बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने कामात सुसूत्रता यावी म्हणून सर्वच तालुक्यांना कार्यकारिणी मध्ये समाविष्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. महिला सेल अध्यक्षपदाची सुत्रे कु. मृणाल सोमनाथ सावळे यांच्याकडे असून बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या घाटावरच्या कार्याध्यक्षपदी वसिम शेख अन्वर तर घाटाखालच्या कार्याध्यक्षपदी प्रशांत देशमुख (खामगांव) यांची निवड झालेली आहे. जिल्हा उपाध्यक्ष म्हणून रविंद्र गणेशे (बुलढाणा), संतोष लोखंडे (चिखली), डॉ.अनिल मापारी (लोणार), गजानन राऊत (खामगाव) काम पाहत आहेत. बुलढाणा जिल्हा पत्रकार संघामध्ये कोषाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी ब्रम्हानंद जाधव यांच्याकडे आहे.

जिल्हा सचिवपदी  शिवाजी मामनकर (मोताळा) यांची वर्णी लागली आहे तर जिल्हा सहसचिव म्हणून गजानन तिडके (देऊळगाव राजा), महेंद्र बोर्डे (धाड) आणि यशवंत पिंगळे (नांदुरा) यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा मुख्यसंघटक  पदी बाबासाहेब जाधव कार्यरत असतील. तसेच जिल्हा संघटक म्हणून प्रेमकुमार राठोड, कैलास राऊत (देऊळगाव माळी), विरेंद्रसिंग राजपूत (टाकरखेड), नागेश मोहिते (धाड) आणि निसार अन्सारी (मेहकर) आदि जेष्ठ पत्रकार जबाबदारी सांभाळतील.

सुषमाताई राऊत (देऊळगाव राजा), श्रीमती सुरेखाताई सावळे, परविन बी सय्यद (चिखली), वैशालीताई तायडे, मोनीकाताई वानखेडे (खामगाव) या जिल्हा महिला प्रतिनिधी म्हणून कार्यरत असणार आहेत. जिल्हा पत्रकार संघाचे उपक्रम, कार्यक्रम तसेच महत्वाच्या घडामोडींची प्रसिध्दी करण्याची महत्वाची धुरा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख म्हणून अभिषेक वरपे यांच्याकडे देण्यात आली आहे, तर प्रसिध्द प्रेस फोटोग्राफर निनाजी भगत जिल्हा सहप्रसिध्दी प्रमुखपदी नियुक्त करण्यात आले आहे.

विभागीय पातळीवर संघटनात्मक निर्णय प्रक्रियेचे योगदान महत्वाचे ठरते यासाठी 13 तालुक्यांच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2 तालुके व 1 विभाग आणि प्रत्येक विभाग निहाय दोन विभागीय संघटकांची नेमणूक करण्याचे बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने निश्चित केले आहे. त्यानुसार मेहकर-लोणार साठी शेख समद (लोणार), मलकापूर-नांदुरा साठी पुरुषोत्तम भातूरकर (नांदुरा), शेगाव-खामगाव करीता धनराज ससाणे (शेगाव) आणि ईश्वर ठाकूर (खामगाव) यांची विभागीय संघटक म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. मोताळा-बुलढाणा-चिखली या तिन तालुक्यांच्या विभागीय संघटक पदी रहेमत अली, रेणुकादास मुळे (चिखली) आणि संजय शिराळ (मोताळा) यांच्यावर जबाबदारी असणार आहे.

बुलढाणा जिल्हा कार्यकारिणीमध्ये 'केंद्रीय सदस्य' म्हणून विजय चोपडे, तुकाराम रोकडे (नांदुरा), रविंद्र फोलाने (चिखली) शिवाजी वाघ, मोहम्मद इद्रिस, विलास खंडेराव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.पत्रकारांच्या आरोग्य संबंधी समस्यांचे निराकरण दृत गतिने व्हावे तसेच शासनाच्या आरोग्यदायी योजनांचा लाभ पत्रकारांना मिळावा यासाठी बुुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने  ‘बुलढाणा जिल्हा पत्रकार आरोग्य सेल’ची स्थापना केली असून या सेलच्या अध्यक्षपदाचे नेतृत्व एबीपी माझाचे जिल्हाप्रतिनिधी संजय महाजन यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तर जिल्हा सचिव म्हणून शाकीर हुसैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

डिजिटल मिडीया परिषदेची* जिल्हा कार्यकारिणीही गठीत झाली आहे. सदर कार्यकारिणीच्या विभागीय सचिवपदी जितेंद्र कायस्थ यांची निवड झाली आहे तर जिल्हाध्यक्षपदी मयुर निकम आणि सरचिटणिसपदी दिपक मोरे डिजिटल मिडीया परिषदेमध्ये जबाबदारी सांभाळत आहे उपाध्यक्षपदी किशोर खंडारे यांची निवड झाली आहे. श्रीधर ढगे डिजिटल मिडीया परिषदेचे घाटाखालील अध्यक्ष म्हणून काम पाहतील.

मराठी परिषदेशी संलग्नित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तालुका पत्रकार संघ गठीत करण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे. संबंधित तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचे पदसिध्द सदस्य असतील. अजुनही अनेक पत्रकार बुलढाणा जिल्हा कार्यकारिणीत सहभागी होण्यासाठी इच्छुक असून पुढील काही दिवसात अंतिम विस्तारित महाकार्यकारिणी घोषीत केली जाणार असल्याची माहिती बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या