🌟उत्तर प्रदेशातेल प्रयागराजमध्ये सुरू होणाऱ्या महाकुंभ मेळ्यात अदानी समुह करणार 'अन्नदान सेवा'......!

 


🌟अदानी समूहाकडून महाकुंभमध्ये अन्नदानाची सेवा : दररोज १ लाख भाविकांना प्रसादाचे वाटप🌟

दिल्ली :- उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराजमध्ये येत्या दि.१३ जानेवारी २०२५ पासून महाकुंभ -२०२५ मेळ्याची सुरुवात होणार आहे. महाकुंभ मेळ्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

या पवित्र सोहळ्यासाठी देशभरातील साधू- संतांसह जगभरातील अनेक भाविकांची उपस्थिती असणार आहे. विशेष म्हणजे या भव्य कार्यक्रमात अब्जाधीश उद्योजक गौतम अदानी महाप्रसाद सेवा देणार आहेत यानुसार दररोज १ लाख भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाणार आहे. या पवित्र महाकुंभाची सुरुवात १३ जानेवारीपासून होणार असून, २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यासाठी ४० कोटी भाविक येण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, उद्योगपती गौतम अदानी या महाकुंभात सेवा देणार आहेत. यासाठी त्यांनी इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शिअसनेस सोबत हातमिळवणी केली आहे. या माध्यमातून दररोज सुमारे १ लाख भाविकांना महाप्रसाद सेवा दिली जाणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या