🌟घटने प्रकरणी सराफा व्यापारी तेजस सोनी आणि हेमंदर जैन या दोन्ही सराफा व्यापाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल🌟
मुंबई : मुंबईतील काळबादेवी परिसरात सोन्याचे विविध डिझाईनचे दागिने बनविण्यासाठी दिलेल्या सोन्याचा बारसह सॉल्डिंगसह दुरुस्तीसाठी दिलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करून एका ज्वेलर्स (सराफा) व्यापाऱ्याची त्यांच्याच परिचित दोन व्यापाऱ्यांनी २ कोटी २२ लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या घटने प्रकरणी सराफा व्यापारी तेजस ललित सोनी आणि हेमंदर हिरालाल जैन या दोन्ही सराफा (ज्वेलर्स) व्यापाऱ्यांच्या विरोधात एल.टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ते दोघेही पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. घाटकोपरचे रहिवाशी असलेले माणक शांतीलाल जैन हे सोन्याचे व्यापारी आहेत त्यांनी आरोपींना दागिने बनविण्यासाठी दोन किलो सोन्याचे बार दिले होते.
0 टिप्पण्या