🌟हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील पानकनेरगावात अवैध दारू विक्रेत्यांवर पोलीसांची धडक कारवाई....!


🌟पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका आरोपीसह १४७०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त🌟 

 ✍️शिवशंकर निरगुडे (हिंगोली)

हिंगोली :- सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव हे मराठवाडा सीमेवर असलेले गाव नेहमी अवैध धंद्याने चर्चेत राहिल होते. अनेक वर्षापासून अवैध बेकायदा दारूचा महापूर वाहत होता. सदरील पानकनेरगाव हे दारुड्याचे माहेरघर बनलं होतं. 'दोस्त दोस्त ना राहा' अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तर काही दारू विक्रेत्यांनी विडाच हाती उचलला होता जो येईल तो मनमानी कारभार करत अवैध विक्री करत होता स्वतःचे संसार थाटून दुसऱ्यांचे संसार उघड्यावर आणत होता. अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

सदर मात्र सेनगाव पोलिसांच्या सतर्कपणामूळे अवैध धंद्यावर  छापा ताकत अनेकांचे दारू अड्डे  उद्ध्वस्त करून टाकले होते पोलिसांच्या दमदार कामगारीमुळे गावकऱ्यांनी काही दिवस निःश्वास सोडला होता मात्र पुन्हा एकदा दारू विक्रेत्यांनी डोकं वर काढत  सराईत दारू विक्रेता संतोष हौसाजी खंदारे हा चोरट्या मार्गाने विक्री करत होता पोलिसांना गोपनीय माहिती मिळत पोलिसांनी केलेल्या कारवाईत अवैधरीत्या देशी दारू जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पान कनेरगाव येथील राहत्या घरी संतोष हौसाजी खंदारे वय ३९ हा अवैधरीत्या देशी दारूची मद्यविक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती  त्यावरून त्याच्यावर कारवाई करीत राजूदास जाधव बिट जमादार यांनी अवैधरित्या देशी दारूच्या २१ बाटल्या असा १४७०  रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बाटल्या जप्त करून त्याच्यावर कारवाई करण्यात आली.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या