🌟भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस ३१ जानेवारीपर्यंत दिल्लीत तळ ठोकून राहणार🌟
मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीत बाजी मारण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी केली असून दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर दिल्लीचे स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी सोपवली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले असून तेथे त्यांच्या सभा पार पडणार आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर दिल्लीत मुख्यमंत्री फडणवीस काँग्रेस पक्षासह आम आदमी पार्टीवर निशाणा साधणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस ३१ जानेवारीपर्यंत दिल्लीत तळ ठोकून राहणार आहेत. दिल्लीत फडणवीसांच्या एका दिवशी तीन सभा होणार आहेत. बुधवारी दिल्लीतील डीसी चौक, सेक्टर ९ रोहिणी येथे फडणवीसांनी प्रचारसभा घेतली. तर पहाड गंज भागात मराठी प्रकोष्ठ बैठकीला ते उपस्थित राहिले.....
0 टिप्पण्या