🌟महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीनंतर पुन्हा अग्नितांडव : सुदैवाने जीवीतहानी नाही🌟
प्रयागराज : उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात मागील काही दिवसांपासून दररोज एकामागून एक दुर्घटना घडत असून प्रयागराज येथील कुंभमेळ्यात काल २९ जानेवारी २०२५ रोजी संगम घाट येथे चेंगराचेंगरी होवून जवळपास ३० पेक्षा जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागले. यातील गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत या प्रकरणाला दुसरा दिवस उलटत नाही तोच आज गुरुवार दि.३० जानेवारी रोजी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात भाविकांच्या निवाऱ्यासाठी उभारण्यात आलेल्या टेन्टला आग लागली बघता-बघता या आगीने रौद्ररुप धारण केले होते. आग इतकी भीषण होती की, परिसरात दुरदुर पर्यंत काळा धुर पसरला होता.
उत्तर प्रदेशात मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर दर १४४ वर्षानंतर महाकुंभ मेळा आयोजित करण्यात आला आहे. बुधवारी पहाटे या कुंभ मेळ्यात अमृत स्नानासाठी मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानासाठी भाविकांनी प्रयागराज येथील संगम घाटावर प्रचंड गर्दी केली होती. त्यातच चेंगराचेंगरी होवून ३० हून अधिक भाविकांना आपले प्राण गमवावे लागले. अजून काही भाविकांचा शोध सुरु आहे. प्रयागराज मधील सेक्टर २२ मधील भाविकांच्या विश्रामासाठी उभारण्यात आलेल्या टेन्टला आज सकाळी अचानक आग लागली. बघताबघता या आगीने रौद्ररुप धारण केले. या परिसरात असलेल्या १५ टेन्ट आगीच्या भष्यस्थानी आले. ही आग इतकी भीषण आहे की आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले आहेत. तसेच, अग्निशमन दलाच्या पथकाने आजूबाजूचा संपूर्ण परिसर रिकामा केला आहे. अग्नीशमन दलासह उत्तरप्रदेश प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ज्या ठिकाणी आग लागली आहे. त्या ठिकाणी जास्त गर्दी नसल्याचे समोर येत आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही......
0 टिप्पण्या