🌟नांदेड येथील सचखंड गुरुद्वारात दशमेशपिता साहिब श्री.गुरु गोविंदसिंघजी यांचा प्रकाशपर्व उत्साहात साजरा...!


🌟दशमेशपिता साहीब श्री.गुरु गोविंदसिंघजी यांचे विचार हेच विश्व बंधूभावाचे मुळ आधार - से.विजय सतबीरसिंघ


नांदेड (दि.०६ जानेवारी २०२४) - नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड हुजूर साहिब अजबच नगर गुरुद्वारात दशमेशपिता साहिब श्री गुरु गोबिंद सिंघजी महाराज यांच्या प्रकाश गुरुपुरब निमित्त 'विशेष किर्तन दरबार' आयोजित करण्यात आले. गुरु महाराजांचे जीवन व त्यांनी दिलेली शिकवण जगातील लोकांमध्ये बंधूभाव व समानता राखण्यासाठी पुरक ठरेल देश-परदेशातून येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन गुरुद्वारा प्रशासनातर्फे महाराजा रणजीत सिंघ जी यात्री निवास कंपाऊड मध्ये सर्व सोयी सुविधा युक्त नविन भक्त निवासची उभारणी केली जाणार आहे, ज्याचे काम प्रगती पथावर आहे. येणाऱ्या भाविकांसाठी गुरुद्वारा बोडां तर्फे २४ तास लंगर प्रसादची सेवा करण्यात येते. भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनातर्फे फ्री-बस सेवा रेल्वे स्टेशन आणि विमानतळ ते गुरुद्वारा साहिब पर्यंत करण्यात आलेली आहे, गुरुद्वारा सचखंड बोर्ड तर्फे संचलित दशमेश हॉस्पीटल मध्ये ओ. पी. डी. सोबतच डायलेसीस चे उपक्रम यशस्वीरीत्या चालू आहेत पुढील काळात ह्या सोयी सुविधा अधीक वाढविण्याच्या दृष्टीने बोर्डाची वाटचाल सुरु आहे. संस्थेचे ध्येय फक्त मानवतेची सेवा करणे हेच आहे आणि या सेवांचा लाभ सर्व जनतेने घ्यावा.


तसेच शिख नवयुवकांनी आय.ए.एस.,आय.पी.एस.सारखे उच्च पदांवर आपली उपस्थिती नोंदवावी व देशाची तसेच पथाची सेवा करावी व यासाठी योग्य असे मार्गदर्शन व गरजू विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस ची व्यवस्था केलेली आहे.दि.०५ जानेवारी रोजी किर्तन दरबार आयोजित करण्यात आले ज्यामध्ये तख्त सचखंड साहिब चे मुख्य पुजारी संत बाबा कुलवंत सिंघ जी जत्थेदार साहिब तसेच सर्व पंजप्यारे साहिबानसह मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. या विशेष किर्तन दरबारमध्ये जगप्रसिद्ध रागी जत्थे द्वारा किर्तन करून भाविकांना तृप्त केले.

आज दि. ०६ जानेवारी २०२५ रोजी परंपरागत पध्दतीने श्री गुरु गोबिंद सिंघ जी महाराज यांच्या प्रकाश पर्दा निमित्त सायंकाळी ०४:०० वाजता निशान साहिब, गुरु महाराज चे सोने व चांदी चे काठी चे घोडे, किर्तनी जत्थे, गतका पार्टी, खालसा हाईस्कुलचे शाळकरी विद्यार्थी तर्फे लेझीम व रिवीनचे देखावे बैंड-बाजा सोबत सादर करण्यात आले. हे नगर किर्तन शहरातील मुख्य मार्गानी भ्रमण करून रात्री १०:०० वाजता गुरुद्वारा गेट नं. ०१ (दर्शन देवडी) येथे समापन करण्यात आले. ज्यामध्ये मोठ्या संख्येत भाविक सहभागी झाले. यावेळी गुरु गोबिंद सिंघ जी महाराज यांच्या 358 व्या प्रकाशपर्वा निमित्त सर्व समाज बांधवांना डॉ.विजय सतबीर सिंघ जी प्रशासक, गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्ड, नांदेड आणि स.जसवंत सिघ बॉबी यांनी शुभेच्छा दिल्या........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या