🌟यावेळी जेष्ठ साहित्यिक कलावंत व पत्रकार जगदीश जोगदंड यांच्या हस्तें जांभुळ बेटावर ध्वजारोहण करण्यात आले🌟
परभणी :- मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा-पालम तालुक्याच्या गोदावरी नदीच्या मध्यभागी वसलेले एकमेव निसर्गरम्य पर्यटनस्थळ असलेल्या जांभुळबेटावर प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी ७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला 'भारत माता की जय' 'प्रजासत्ताक दिनाचा विजय असो' 'आमचं बेट हरीत बेट,आमचं बेट जांभूळबेट' अशा गगनभेदी गर्जनांसह भारतीय राष्ट्रगीताच्या मधूर सुस्वरांनी जांभूळबेटाचा आसमंत दुमदुमून गेला पंचक्रोशीतील उत्साही पर्यावरणप्रेमीं देशभक्त व क्रिएटिव्ह अकॅडमीच्या असंख्य विद्यार्थ्यांनी या निसर्गरम्य जांभूळबेटावर उपस्थिती लावली.
यावेळी जेष्ठ साहित्यिक कलावंत व पत्रकार जगदीश जोगदंड यांच्या हस्ते या जांभुळ बेटावर भारतीय तिरंगा ध्वजाचे देशभक्तीमय वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंदराव दुधाटे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिन शिंदे,वैभव लिंगायत उपस्थित होते. प्रमुख उपस्थितात पर्यावरणप्रेमी अर्जुन दुधाटे, राम दुधाटे, पंढरीनाथ शिंदे, गजानन चुडावकर, गोविद जाधव, सचिन चांदणे, सोपान दुधाटे, लक्ष्मण दुधाटे, ज्ञानेश्वर दुधाटे आदींचा समावेश होता. सूत्रसंचालन क्रिएटिव्ह अकॅडमी चे ऋषिकेश पौळ यांनी केले. संदीप दुधाटे यांनी आभार मानले.
कृषिभूषण कांतरावकाका झरीकर यांच्या अनोख्या संकल्पनेतून दिवसेंदिवस वनराईने नटत असलेल्या बेटावर राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण झाले पाहिजे ही बाब पुढे आली. कांतराव देशमुख झरीकर यांची ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पर्यावरणप्रेमीं ही प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठीं सरसावले.बेटावर जाण्या - येण्यासाठी बोटीच्या व्यवस्थेसह मंदिराची रंगरंगोटी, स्वच्छता आदी कामे पूर्ण झाली असून पर्यटकांचा ओढा वाढला आहे. जांभूळ, बांबू, मोहगणी, सिताफळ, तुती आदि झाडे लावून जांभूळबेट संवर्धन समिती स्थापन करून युवा कार्यकर्ते यांनी लोकसहभागातून विद्यूत मोटार बसवून ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कामी नांदेड येथील वृक्षमित्र फाऊंडेशनने पुढाकार घेऊन खूप मोठी मोलाची मदत केली आहे......
0 टिप्पण्या