🌟राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत पांढरी येथे सात दिवसीय विशेष शिबिर संपन्न🌟
परभणी :- राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर अंतर्गत पांढरी येथे २१ जानेवारी ते २७ जानेवारी २०२५ रोजी कै. अंबादासराव वरपूडकर कृषी महाविद्यालय वरपूड येथील विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान, रक्त दान शिबीर, श्रमदान, वृक्षारोपण, जन जागृती, योग शिबीर, अनेमिया (रक्ताक्षय) तपासणी असे विविध उपक्रम राबविले. या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून अजितदादा वरपूडकर (अध्यक्ष, कै. अं. व. कृ. म. वरपूड), अध्यक्ष ज्ञानोबा माणिकराव पांचाळ (सरपंच, पांढरी), प्रमुख अतिथी श्री. जगन्नाथराव चव्हाण (उपसरपंच, पांढरी), श्री. अंगद ढोले (शालेय व्यवस्थापन समिती, पांढरी), श्री. ज्ञानोबा ढोले (तंटामुक्ती समिती, पांढरी), श्री. विनोद लांडगे (मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पांढरी), सुशीलभैया वरपूडकर (सचिव, कै. अं. व. कृ. म. वरपूड), डॉ. ए. ए. चव्हाण सर (संचालक, शिक्षण), प्राचार्य मोरे आर. एम., राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. रनेर आर. बी., कॉलेजचे प्राध्यापक देशपांडे मॅडम, कांबळे मॅडम, पाटील मॅडम, गायकवाड मॅडम, शिनगारे सर आणि गावातील गावकरी मंडळी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रणेर आर. बी. सर यांनी केले आणि या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख मार्गदर्शक डॉ. माणिक लिंगायत (अ.नि.स.) व . मुंजाजी कांबळे (अ.नि.स.), अशोक तळेकर (योग शिक्षक, पिंगळी), डॉ. अर्चना भुसेवाड (वैद्यकीय अधिकारी, पिंगळी), श्री. आत्माराम जेठाळे व श्री. संजय वाघमारे सर (समाजसेवा अधीक्षक, परभणी), श्रीमंती सोनवणे मॅडम (महिला व बालविकास) यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना व कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अतिशय अमूल्य मार्गदर्शन केले. शिबिराचे उद्दिष्ट, नियोजन, अंमलबजावणी यावर मार्गदर्शन केले.....
0 टिप्पण्या