🌟नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल🌟
नांदेड :- नांदेड शहरातील पाटबंधारे नगरात तब्बल १९ वर्षापूर्वी दि.०६ एप्रिल २००६ रोजी पहाटेच्या सुमारास राजकोंडवार यांच्या घरी एक मोठा स्फोट झाला होता या स्फोटात नरेश राजकोंडावार हा जागीच ठार झाला होता तर या स्फोटाच्या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले होते. जखमींपैकी हिमांशू पानसे याचा देखील उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.
सुरुवातीला हा स्फोट फटाक्याचा असल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला होता पोलिस तपासात मात्र राजकोंडावार यांच्या घरात जीवंत बॉम्ब सापडल्याचे नमूद करण्यात आले होते नरेश राजकोंडावार याच्या शवविच्छेदनात खिळे आढळले होते त्यावरुन सदर स्फोट हा फटाक्याचा नसून बॉम्ब बनवतांना किंवा ठेवतांना झाला असावा हे स्पष्ट झाले.या स्फोटाने केवळ नांदेडच नव्हे तर राज्य आणि देश पातळीवर खळबळ उडाली होती. राजकोंडावार व हिमांशू पानसे यांचे हिंदूत्ववादी संघटनाचे कार्यकर्ते असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी सुरुवातीला भाग्यनगर पोलीसांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक देहडकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा फटाक्यांचा स्फोट नसून बॉम्बस्फोट असल्याचे लक्षात आल्यानंतर तपासाची सुत्रे भाग्यनगरचे तत्कालिन पोलीस निरिक्षक श्रीकांत महाजन यांच्याकडे देण्यात आली त्यानंतर या तपासाची सुत्रे रमेश भुरेवार यांच्याकडे येताच त्यांनी संशयावरुन २२ जणांना अटक केली.
नंतर या प्रकरणाचा तपास एटीएसचे अनिल तमायचेकर यांच्याकडे सोपविण्यात आला. तपासात सबळ पुरावे नसल्याने एटीएसने केवळ सात जणांवर आरोपपत्र दाखल केले. इतर पंधरा आरोपीविरुध्द १६९ चा अहवाल न्यायालयात सादर करून आरोप पत्रातील पंधरा जणांची नावे वगळण्यात आली. याप्रकरणी विरोधक व माध्यमांनी गंभीर आरोप केले, हे प्रकरण देशाच्या संसदेतही गाजल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. सीबीआयचे अधिकारी रमन त्यागी यांनी या प्रकरणाचा तपास केला, त्या तपासात आणखी तीन आरोपींची नावे समाविष्ट झाली. यात राहुल पांडे (मयत), रामदास मुंगल, मारोती वाघ, डॉ. उमेश देशपांडे, योगेश देशपांडे, अॅड. मिलिंद एकतादे, मंगेश पांडे, राकेश धायडे, मुदखेडचे तुप्तेवार अन्य एक अशा दहा आरोपी विरुद्ध नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. या खटल्याची सुनावणी करतांना न्यायालयात ४९ साक्षीदार तपासण्यात आले. सबळ पुराव्या अभावी संपुर्ण दहा आरोपींची नांदेड जिल्हा व सत्र न्यायाधीश सी.बी. मराठे यांनी आज निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणाचा आता तब्बल १९ वर्षांनी निकाल लागला आहे.
या प्रकरणात पहिल्यांदाच भगवा दहशतवाद किंवा हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग करण्यात आला, यातील काही आरोपींवर जालना,परभणी आणि मालेगाव इथल्या स्फोट प्रकरणातही आरोपी करण्यात आले होते. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सीबीआयचे वकील सी.बी.दराडे यांनी न्यायालयात बाजू मांडली. तर आरोपींच्यावतीने ॲड.आर.जी. परळकर,ॲड.आरती बाहेती,ॲड.रोनवाल, जालन्याचे विधिज्ञ चंद्रकांत पत्की यांनी न्यायालयात बाजू मांडली होती......
0 टिप्पण्या