🌟राज्यातील असंघटित कामगारांची आर्थिक पिळवणूक थांबणार ? असंघटित कामगार होणार संघटित....!


🌟असंघटित क्षेत्रातील कामगारांना संघटित करणार : महाराष्ट्र इंटकचा निर्णय🌟

मुंबई : राज्यातील असंघटित कामगारांची आर्थिक पिळवणूक थांबणार ? असंघटित कामगार होणार संघटित असंघटित कामगारांना समान काम-समान वेतन तसेच आरोग्य सोयीसुविधा मिळाव्यात या उद्देशाने असंघटित क्षेत्रातील कामगारांना संघटित करण्याचे काम महाराष्ट्र इंटकने हाती घेतले आहे, अशी माहिती महाराष्ट्र इंटक कोर कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिली आहे.

महाराष्ट्र इंटक कोर कमिटीची बैठक परळ येथील मंझील मजदूर येथे नुकतीच पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते म्हणाले की, गेल्या दहा-पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळापासून अनेक उद्योगात असंघटित कामगारांची संख्या वाढत चालली आहे. त्यांच्याकडून कायम कामगारांचे काम करून घेण्यात येते. परंतु तुटपुंजे वेतन, आरोग्य सुविधांची गैरसोय तसेच सामाजिक हक्कापासून ते वंचित आहेत. बांधकाम कामगार, अंगणवाडी आशा कर्मचारी, ऊसतोड कामगार, स्थानक वर्कर्स इत्यादी असंघटित क्षेत्रातील कामगारांचा यामध्ये समावेश आहे.

या बैठकीत येत्या ३ मे रोजी, म्हणजे महाराष्ट्र इंटकच्या स्थापनादिनी भव्य अधिवेशनाचे आयोजन करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. या निमित्ताने एक माहितीपूर्ण स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. यावेळी कार्याध्यक्ष निवृत्ती देसाई, कोषाध्यक्ष दिवाकर दळवी, उपाध्यक्ष देवराव सिंग, जी. बी. गावडे, दादाराव डोंगरे, मुकेश तिगोटे, बजरंग चव्हाण आदींनी अनेक संघटनात्मक बाबींवर विस्तृत चर्चेत भाग घेतला.

केंद्र शासनाच्या ई श्रम पोर्टलवर व्यवसाय निहाय वर्गीकरणानुसार असंघटित कामगारांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी एकत्रितपणे आराखडा सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या