🌟केंद्रातील पंतप्रधान मोदी सरकार किसान क्रेडीट कार्डची मर्यादा ५ लाख रुपयें करण्याची शक्यता🌟
मुंबई :- केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून २०२५ च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी मिळण्याची शक्यता आहे. आगामी ०१ फेब्रुवारी २०२५ रोजी घोषित होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकार किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ३ लाख रुपयांवरुन ५ लाख रुपये करण्याची तयारी करत आहे. केसीसी मर्यादेसंदर्भात सरकारला सतत मागण्या प्राप्त होत होत्या. त्यामुळं या मागणीच्या संदर्भातने सरकार केसीसीची मर्यादा ५ लाख रुपये करण्याची शक्यता आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजना २६ वर्षांपूर्वी १९९८ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत शेती व संबंधित कामे करणाऱ्या शेतकऱ्यांना ९ टक्के व्याजाने अल्पमुदतीचे कर्ज दिले जाते. या योजनेची विशेष बाब म्हणजे सरकार कर्जावरील व्याजावर २ टक्के सूटही देते. त्याचवेळी, जे शेतकरी संपूर्ण कर्जाची वेळेवर परतफेड करतात, त्यांना प्रोत्साहन म्हणून आणखी ३ टक्के सवलत दिली जाते. म्हणजेच हे कर्ज शेतकऱ्यांना केवळ ४ टक्के वार्षिक व्याजावर दिले जाते. ३० जून २०२३ पर्यंत असे कर्ज घेणाऱ्यांची संख्या ७.४ कोटींहून अधिक होती. ज्यावर ८.९ लाख कोटींहून अधिकची थकबाकी दिसली.....
0 टिप्पण्या