🌟छ.संभाजीनगर येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त भव्य हिंदू जनजागरण रॅली...!


🌟रॅली मुळे संभाजीनगर शहरात भगवे चैतन्य विविध घोषणांनी शहर दणाणले🌟 


छत्रपती संभाजीनगर : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा २३जानेवारीला ९९ वा जन्मदिन. यानिमित्त शिवसेनेच्या वतीने  २३ जानेवारी रोजी भव्य हिंदू जनजागरण रॅली काढण्यात आली शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या रॅलीत संपर्कप्रमुख विकास जैन,माजी महापौर नंदकुमार घोडेले,हर्षदाताई शिरसाट,महीला आघाडी जिल्हा संघटक शिल्पाराणी वाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 रॅलीत मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती होती. या रॅलीमुळे शहरात भगवे चैतन्य निर्माण झाले असून शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून रॅली ची सुरवात झाली. क्रांतीचौक - पैठण गेट - मछली खडक -  गुलमंडी - समर्थनगर - अदालत रोड - अमरप्रीत चौक - वीर सावरकर चौक - उलकानगरी - जवाहरनगर पोलिस स्टेशन - गजानन महाराज मंदिर चौक - पुंडलिक नगर - जयभवानी नगर - वसंतराव नाईक चौक सिडको -  कॅनॉट प्लेस मार्गे एम जी एम परिसर या ठिकाणी तयार होत असलेले श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे स्मुर्ती वन या ठिकाणी समारोप करण्यात आला. रॅली मुळे शहरात भगवे चैतन्य निर्माण झाले असून *छत्रपती शिवाजी महाराज की जय , - छत्रपती संभाजी महाराज की जय,- शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो ,- पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो,* *एकनाथ शिंदे साहेब मागे बढो हम तुम्हारे साथ है ,- कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला* या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणले.

समारोपाच्या ठिकाणी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ म्हणाले की बाळासाहेब ठाकरे हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते एक चळवळ होते. मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी सुरू केलेल्या शिवसेना या चळवळीने सामान्य लोकांना आवाज दिला आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडली. त्यांच्या नेतृत्वाने सामाजिक परिवर्तनाची मोठी चळवळ उभारली, ज्याचा प्रभाव आजही कायम आहे. त्यांच्या विचारांची शिकवण आणि कार्य खऱ्या अर्थाने पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या जिल्ह्यात सर्व सामान्य जनतेसाठी काम करत आहोत आणि करत राहू.

यावेळी उपजिल्हा प्रमुख संतोष बोर्डे,रमेश बहुले,दशरथ मुळे,गजानन मनगटे शहर संघटक संतोष मरमट,दीपक पवार,शहरप्रमुख मनोज बल्लाळ,उपशहर प्रमुख राजेश जंगले,गणेश जाधव,सतीश निकम,राजू राजपूत,रणजीत ढेपे,संजय भुजबळ,विजय पैठणे,अनिल बीरारे,अनिल मुळे,राहुल यलदी, प्रसिध्दीप्रमुख अभिजीत पगारे,नंदू म्हस्के , आदित्य दहिवाल, पराग कुंडलवाल, माजी नगरसेवक गजानन मनगटे ,उद्योग आघाडी जिल्हा संघटक मोहन बरंडवाल, हिम्मत पटेल,  लक्ष्मण बताडे , गणेश तेलोरे, अरविंद कामतिकर,महीला आघाडीच्या लक्ष्मीताई म्हस्के, स्मिता पटारे , प्रीती पाटील आदी शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते........

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या