🏆मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पुर्णेच्या खेळाडूंनी पुर्णा तालुक्याचे नाव केले उज्वल🏆
हिंगोली (दि.०५ जानेवारी २०२५) - हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील राजू भैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठान यांच्यावतीने आज रविवार दि.०५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०७.०० वाजताच्या सुमारास वसमत शहरातील मयूर मंगल कार्यालय येथे वसुमती राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा - २०२५ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये परभणी जिल्हा लंगडी असोसिएशनच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले व मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आपल्या पुर्णा तालुक्याचे नाव उज्वल केले.
यामध्ये स्पर्धेत माही जगन्नाथ कराळे हिने महिला गटात आठरावा क्रमांक मिळून एक हजार एक रुपये व स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र मिळविले तसेच वयो गट १७ मुली या वयोगटात अनुराधा स्वामी व पुनम बोबडे यांनी ही ५०१ रुपये व स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र मिळविले या सर्व खेळाडूंचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री विनय जी वाघमारे उपाध्यक्ष भीमरावजी कदम सचिव श्रीनिवास काबरा विजयकुमार रुद्रवार उत्तमराव कदम साहेबराव कदम कडुबा काकडे बी बी मोरे डी. एल रणमाळ डॉ हरिभाऊ पाटील मुख्याध्यापक डी एल उमाटे हिंगणे सर सर्व शिक्षक वृंद तसेच असोशिएशनचे अध्यक्ष संतोष .एकलारे उपाध्यक्ष सतिश टाकळकर ] कैलास टेहरे उद्धव बोबडे या सर्वांनी अभिनंदन केले मागदर्शन सज्जन जैस्वाल व प्रकाश रौंदळे सर यांनी केले......
0 टिप्पण्या