🌟नामांतराची लढाई ही बाबा साहेबांच्या विचाराची लढाई होती - डॉ विवेक मवाडे.......!


🌟पुर्णेत आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले🌟 


पुर्णा :- डॉ बाबासाहेब आंबेडकराच नाव विद्यापीठाला द्यावे यासाठी १७ वर्ष ही लढाई लढली ही लढाई बाबासाहेबाच्या विचाराची होती असे प्रतिपादन डॉ विवेक मवाडे यांनी केले पूर्णा येथे तथागत मित्र मंडळाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या निमिताने नामांतर लढाईत शहिदांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन डॉ आंबेडकर चौक पूर्णा याठिकाणी करण्यात आले होते या वेळी अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी नामांतर लढ्यातील अग्रणी नेतृत्व प्रकाश कांबळे प्रमुख मार्गदर्शक म्हणून पू.भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो प्रमुख वक्ते म्हणून युवा पँथरचे संस्थापक अध्यक्ष तथा नामांतर लढ्यात अग्रणी एस.एम.प्रधान यांचे सुपुत्र राहूल प्रधान नामांतर लढ्यातील शहीद जर्नाधन मवाडे यांचे सुपुत्र डॉ.विवेक मवाडे नांदेड सत्कार मूर्ती म्हणून परभणी येथील संविधाना समर्थनात शहिद झालेले सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मातोश्री विजयाबाई सुर्यवंशी बंधू प्रेमनाथ सुर्यवंशी संविधानाच्या सन्मानार्थ शहीद झालेले लोकनेते विजय वाकोडे यांचे सुपुत्र अशिष वाकोडे स्वागताध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित संयोजक तथागत मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरपरिषदेचे गटनेते उत्तमखंदारे प्रमुख पाहुणे म्हणून नामदेवराव राजभोज यादवराव भवरे हाजी कुरेशी दिलीप हनुमंते जाकीर कुरेशी राजकुमार एंगडे महेबूब कुरेशी रौफ कुरेशी नगरसेवक ॲड धम्मा जोंधळे हर्षवर्धन गायकवाड प्रा अशोक कांबळे कॉ अशोक व्ही कांबळे तुषार गायकवाड देवराव खंदारे मुकूंद पाटील दिलीप गायकवाड अब्दुल मुजीब अखिल अहमद बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे अमृत कऱ्हाळे अतूल गवळी उमेश बार्हाटे एमयु खंदारे बाबाराव वाघमारे गौतम वाघमारे ज्ञानोबा जोंधळे माजी नगरसेविका गयाबाई खंदारे मंजुषाताई पाटील किशोर ढाकरगे अशोक धबाले सुनिल कांबळे आदि उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकराच्या पुतळ्यास प्रमुख उपस्थिताच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


त्या नंतर नामांतर लढ्यातील शहिदाच्या प्रतिमांना पुष्प सर्मपण करून अभिवादन करण्यात आले भदंत उपगुप्त महाथेरो यांनी त्रिशरण पंचशिल दिले त्यानंतर मान्यवरांचे स्वागताध्यक्ष दादाराव पंडित उत्तम खंदारे प्रविण कनकुटे यांनी स्वागत व सत्कार केले मान्यवरांनी आपले विचार मांडले पुढे बोलतांना मवाडे म्हणाले की नामांतराची लढाई अस्मितेची व स्वाभिमानाची होती बाबासाहेबानी आम्हाला शिक्षणाचा मंत्र दिला होता आणि मराठवाड्यात त्या काळी शिक्षणाची सोय नव्हती उस्मानिया विभापीठात शिक्षण घेण्यासाठी जावे लागत असल्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद येथे शिक्षणाची ज्ञानगंगा आणली त्यामुळे मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकराच नांव देण्याचा लढा सुरू झाला आमच आयुष्य म्हणजे बाबासाहेब बाबासाहेबाच नांव आमच्या श्रेष्ठ असल्याने ही लढाई १७ वर्ष लढली यामध्ये १५० लोकानी प्राणाची आहुती दिली स्वातंत्र्य समता बंधुता हा नामांतराचा लढा होता ही लढाई समाजाच्या भरोशावर लढली आहे लढाईची ताकत बाबासाहेबाच्या विचाराची ताकत आहे कालची लढाई आजच्या लढाई लढण्यासाठी सर्वांनी एकत्र या असे आवाहन केले व राहुल प्रधान म्हणाले की, नामांतराचा लढा भविष्यातील पिढी घडवलण्याचा लढा होता स्वाभिमान अस्मिता जागृत करण्याचा होता पँथर चळवळ नसती तर आज दलित वस्त्याचे मसणवटे झाले असते आज परिस्थिती नामांतराच्या लढाई सारखीच आहे भिमा कोरगाव प्रकरण असो पूर्णेतील आंबेडकर जयंतीवर झालेली दगडफेक असो की परभणी येथील घडलेली घटना असो आताच्या घडीला आपल्या सोबत कुणी ही नाही न्याय व्यवस्था नाही शासन प्रशासन नाही मिडिया नाही फक्त बाबासाहेबाचे विचार सोबत आहेत हेच विचार घेऊन पुढची लढाई आपल्याला लढावी लागणार आहे नामांतराची लढाईची रोमहर्षक इतिहास व आजची परिस्थिती यावर प्रकाश टाकला यावेळी अशिष वाकोडे यांनी नामांतराच्या लढाईत लढलेल्या शहिदांनी आपल्या घरादाराची परिवाराच्या विचार न करता समाजासाठी बाबासाहेबाच्या विचारासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले परभणीत घडलेल्या प्रकरणात दोघांना शहिद व्हावे लागले महिलावर मुलांवर तरुणावर पोलीसांनी अत्याचार केला याचा इतिहास त्यांनी सांगितला यावेळी भदंत उपगुप्त महाथेरो यांनी नामांतराच्या लढयावर विचार मांडले प्रकाश कांबळे यांनी अध्यक्षीय विचार मांडले कार्यकमाचे प्रास्ताविक उत्तम खंदारे यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण सरोदे प्रशांत गायकवाड सुमित वाहुळे नितीन भावे सुबोध खंदारे प्रविण कनकुटे धम्मा वाहिवळ आदिनी केले यावेळी शाहीर प्रकाश जोंधळे आणि संच यांनी प्रबोधन गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी हजारोची उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या