🌟बिड जिल्ह्यातील वाढता जातीयवाद गंभीर : याचे परिणाम जिल्ह्यातच नव्हे तर राज्याला भोगावे लागत आहेत...!


🌟जिल्ह्यातील जातीयवाद थांबवा : राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अविनाश नाईकवाडे

🌟राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अविनाश नाईकवाडे यांनी आ.धस,आ.आव्हाडांवर केले पत्रकार परिषदेत गंभीर आरोप🌟

बिड (दि.०६ जानेवारी २०२५) - बिड जिल्ह्यातील वाढता जातीयवाद गंभीर : याचे परिणाम जिल्ह्यातच नव्हे तर राज्याला भोगावे लागत आहेत त्यामुळे जिल्ह्यातील जातीयवाद थांबवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अविनाश नाईकवाडे यांनी आज सोमवार दि.०६ जानेवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे यावेळी पत्रकार परिषदेत अविनाश नाईकवाडे यांनी आ.सुरेश धस,आ.जितेंद्र आव्हाड व मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावर मत नोंदवत जिल्ह्यातील जातीयवाद थांबवा असे आवाहन केले यावेळी नाईकवाडेंनी आ.सुरेश धस यांच्या संदर्भात गंभीर आरोप करीत त्याचे पुरावे दाखवून याबाबत उत्तर मागितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश नाईकवाडे यांनी आज सोमवारी बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यात काही जणांकडून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे नमूद केले मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी ही आमची आणि आमच्या नेत्यांची मागणी आहे. या आरोपींना बीडच्या शिवाजी महाराज चौकात फाशी द्या पण या घटनेच्या आडून राजकारण करु नका हा जिल्ह्यातील वाढता जातीयवाद गंभीर असून याचे परिणाम जिल्ह्यातच नव्हे तर राज्याला भोगावे लागत आहेत. यामुळे जिल्ह्यातील हा जातीयवाद थांबवा असे आवाहन केले. तसेच यावेळी संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुरवातीपासून आक्रमक भूमिका घेतलेल्या आ.सुरेश धस यांच्यावर बोलताना त्यांचे गुन्हेगारारांशी संबंध असल्याचे सांगून याबाबत अनेक पुरावे दाखवत तसेच एका शेतकऱ्याची जमीन लुबाडण्याचा प्रयत्न करीत विरोध करणाऱ्या महिलेची नग्न धिंड काढली त्याचा व्हिडीओच माध्यामांना दाखविला, तसेच घरी ग्रामविकास अधिकारी, ग्रामरोजगार, सरपंच, उपसरपंच यांची आष्टी येथे घरी बैठक घेऊन त्यासाठी प्रत्येकी २ हजार रुपये घेण्यात आले. याबाबत उत्तर मागितले तसेच आ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर ही अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच बीड संतांची भूमी असून, येथे जातीवादाचे विष पसरविण्याचे काम काही जण करीत असल्याचा आरोप केला........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या