🌟एमआयआरडीसी इंजिनिअर भुषण गिरी व भ्रष्ट गुत्तेदार कंपन्यांचे संगणमत उत्कृष्ट ? अरुंद व निकृष्ट रस्त्यांमुळे रहदारीचा प्रश्न गंभीर🌟
पुर्णा (विशेष वृत्त) :- पुर्णेतील पुर्णा-नांदेड राज्यमार्गावरी हिंगोली गेट परिसरातील निर्मानाधिन रेल्वे उड्डाण पुलासह परिसरातील पर्यायी रस्त्यांच्या संथगतीने अंदाजपत्रकाला बगल देऊन होणाऱ्या निकृष्ट कामामुळे परिसरातील रहिवासी नागरिक तसेच या मार्गावरुन मार्गक्रमण करणाऱ्या अनेक गावांतील नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत असून रेल्वे उड्डाणपूलाच्या आसपास बनवण्यात येत असलेले सिमेंट रस्ते अत्यंत अरुंद जवळपास अकरा ते साडेअकरा फुटांचे व अत्यंत निकृष्ट होत असल्यामुळे पुर्णा-नांदेड राज्यमार्गासह परभणी-हिंगोली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या पुर्णा-हयातनगर मार्गाला देखील ०५ वर्ष ०५ महिन्यांपासून म्हणजे जवळपास साडेपाच वर्षांपासून भयंकर साडेसाती लागल्याचे पाहावयास मिळत आहे.
पुर्णा येथील रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम गुत्तेदार कंपन्या एम/एस डिसीएस पि.व्ही.राव व यानंतरचे सब गुत्तेदार कंपन्या गॅलकॉन इन्फ्रॉस्ट्रक्चर प्रा.ली या कंपन्यांनी महाराष्ट्र रेल इन्फ्रॉस्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनली (एमआयआरडीसी) अंतर्गत ९६ कोटी ६६ लाख ३५ हजार ७५७ रुपयांच्या विकास निधीतून २७ ऑगस्ट २०१९ या रेल्वे उड्डाणपूलाच्या बांधकामाला सुरुवात केली सदरील रेल्वे उड्डाणपूलासह आसपासच्या पर्यायी सिमेंट रस्त्यांचे बांधकाम देखील अंदाजपत्रकानुसार दर्जेदार व मजबूत व्हावे या हेतूने एमआयआरडीसीने डिजीएम राकेश शर्मा यांच्यासह इंजिनिअर भुषण गिरी यांची तर गॅलकॉन इन्फ्रॉस्ट्रक्चर प्रा.ली यांच्याकडून प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून अनिल यांची नियुक्ती करण्यात आली डिजीएम शर्मा यांचे या रेल्वे उड्डाणपूलासह आसपासच्या परिसरातील सिमेंट रस्त्यांच्या बांधकामाकडे दुर्लक्ष होत असल्याने इंजिनिअर भुषण गिरी व संबंधित रेल्वे उड्डाणपूल बांधकाम गुत्तेदार कंपन्यांनी अंदाजपत्रकाला मुठमाती देऊन निकृष्ट व दर्जाहीन बांधकामाला सुरुवात केली असल्याचे निदर्शनास येत असून मागील सन २०२३ यावर्षी रेल्वे क्रॉलेटी कंट्रोल प्रशासनाने रेल्वे उड्डाणपूलाचे निकृष्ट दर्जाचे जवळपास सात ते आठ पिल्लर पाडले होते यानंतर तरी रेल्वे उड्डाणपूलासह आसपासच्या पर्यायी सिमेंट रस्त्यांच्या बांधकामात सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु इंजिनिअर भुषण गिरी यांनी गॅलकॉन इन्फ्रॉस्ट्रक्चर प्रा.ली व आरएसव्ही कन्स्ट्रक्शन प्रा.ली.हैद्राबाद या कंपन्यांशी हितसंबंध जोपासत रेल्वे उड्डाणपूलासह आसपासच्या पर्यायी सिमेंट रस्त्यांच्या कामांची देखील वाट लावल्याचे पाहावयास मिळत आहे.
पुर्णा-नांदेड राज्यमार्गावरील हिंगोली गेट परिसरात निर्माणाधिन असलेल्या रेल्वे उड्डाणपूलाच्या आसपासच्या सिमेंट रस्त्यांच्या बांधकामा संदर्भात डिजीएम राकेश शर्मा यांच्याशी आम्ही भ्रमणध्वनी (मोबाईल) द्वारे दि.१९ जानेवारी २०२५ रोजी संपर्क साधून पर्यायी सिमेंट रस्त्यांच्या रुंदी संदर्भात विचारणा केली असता त्यांनी पर्यायी सिमेंट रस्त्यांची रुंदी १५ फुट सांगितली परंतु प्रत्यक्षात या सिमेंट रस्त्यांची रुंदी अकरा ते साडेअकरा फुट असल्याचे निदर्शनास येत असून सिमेंट रस्त्यांचे बांधकाम करण्यापूर्वी खोदकाम करुन मजबूतीकरणासाठी त्यात क्रशसॅड काळ्या दगडापासून कृत्रिमरीत्या निर्मित वाळुचे सोलींग न करता मुरूम व खोदकामातून निघालेल्या मातीचा भरणा करुन सिमेंट रोड बांधकामात स्टिल अर्थात गजाळीचा वापर न करता अत्यंत निकृष्ट व दर्जाहीन केले जात असल्याने पुर्णा-हयातनगर या परभणी-हिंगोली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या या मधल्या मार्गावरील आडगाव,बरबडी,सुहागण,आव्हई गावांसह हिंगोली गेट पलीकडील पुर्णा-पांगरा ढोणे-वसमत या मधल्या मार्गावरील मरसूळ,लोखंडे पिंपळा,डाखोरे वाई,हिवरा,लहान लोण या गावांमधील असंख्य गावकरी/शेतकऱ्यांना या अरुंद सिमेंट रस्त्यांवरून जिवघेणा प्रवास करावा लागणार असून त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे या गावांमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पुर्णेतील बळिराजा साखर कारखाना व वसमत येथील पुर्णा सहकारी साखर कारखान्यात ऊसाची वाहतूक करतांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागणार आहे त्यामुळे भविष्यात या रेल्वे उड्डाणपूलासह आसपासच्या सिमेंट रस्त्यांमुळे पुर्णा तालुक्यातील जनतेला फार मोठ्या संकटांचा सामना करावा लागणार आहे.......
टिप : सदरील विशेष वृत्ताची कॉफी करु नये
0 टिप्पण्या