🌟प्रजासत्ताक दिनानिमित्त स्व.संदिप दुथडे गुरुजी यांच्या स्मरणार्थ शहिद स्मारक स्थळावर शहिदांना दिली सलामी शालेय साहित्यासह खाऊचेही वाटत🌟
पुर्णा (विशेष वृत्त) :- परभणी-हिंगोली संयुक्त जिल्हा असतांना सन १९६५ यावर्षी झालेल्या भारत-पाकीस्तान युध्दात पुर्णा तालुक्यातील गौर येथील सुर्यकांत नामदेवराव जोगदंड हे एकमेव विरजवान दि.१२ सप्टेंबर १९६५ रोजी सिमेवर युध्दात अडकलेल्या भारतीय सैनिकांना रसद पुरविण्यास हेलिकॉप्टरने जात असतांना शत्रू सैन्याने केलेल्या रॉकेट लॉन्चर हल्ल्यात शहिद झाले होते त्यांच्या शहिद स्मारकाठी गौर ग्रामपंचायतीच्या वतीने जागा नियोजित करण्यात आलेली असून या शहिद स्मारकाच्या नियोजित जागा स्थळावर गौर येथील सुर्यसेन मित्र परिवारातील देशभक्त तरुणांनी प्रखर देशभक्ती जागृत करणारा कौतुकास्पद उपक्रम राबवत आज रविवार दि.२६ जानेवारी रोजी ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत स्व.संदिप दुथडे गुरुजी यांच्या स्मरणार्थ शहिद स्मारक स्थळावर एकत्रित येऊन शहिद सुर्यकांत जोगदंड व व वन शहीद सदाशिवअप्पा नागठाणे या शहिदांना सलामी दिली.
संपूर्ण देशासह राज्यात तसेच परभणी जिल्ह्यात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला असतांना व भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह शहिदांना स्मरण केले असतांना मात्र गौर ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी अंजना लाडेकर यांना गौर येथील शाहिद समारकासह शहिद विरजवांचा देखील विसर पडल्याची गंभीर बाब निदर्शनास आली अशा वेळी गौर येथील सुर्यसेन मित्र परिवारातील देशभक्त तरुणांनी एकत्रित येऊन शहिद स्मारकाच्या जागेची स्वखर्चाने स्वच्छता मोहीम राबवून या देशासाठी बलिदान दिलेल्या शहिदांना स्मरण करण्याचा अत्यंत हृदयस्पर्शी कौतुकास्पद उपक्रम राबवून गौर ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी लाडेकर यांना शरमेनं मान खाली घालण्याची वेळ आणली असेच म्हणावे लागेल यावेळी सुर्यसेन मित्र परिवारातील देशभक्त तरुणांच्या वतीने स्व.संदिप दुथडे गुरुजी यांच्या स्मरणार्थ गावातील सरसकट शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय साहित्यासह खाऊचे देखील वाटत करण्यात आले गौर येथील सुर्यसेन मित्र परिवारातील देशभक्त तरुणांच्या या कौतुकास्पद उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.......
0 टिप्पण्या