🌟आरोग्य विभागाकडून २५ हजार ५७८ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे🌟
पुणे :- राज्यात 'गुलेन बॅरी सिंड्रोम'च्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहेत राज्यात 'गुलेन बॅरी सिंड्रोम'च्या रुग्णांची संख्या आता जवळपास १०१ वर पोहोचली असून त्यातील १६ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती समोर आली आहे.राज्यातील एकूण रुग्णांपैकी ६८ पुरुष आणि ३३ महिला असल्याचे समजते आरोग्य विभागाकडून २५ हजार ५७८ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
पुणे ग्रामीणमध्ये ६२ रुग्ण पुणे महापालिकेच्या हद्दीत १९ तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत १४ रुग्ण आणि इतर जिल्ह्यातील ६ रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळत असून रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे.....
0 टिप्पण्या