🌟परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातील फरकंडा येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा.....!


🌟जयक्रांती हायस्कूल तर्फे उपस्थित सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत🌟

 परभणी/पालम - परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातील फरकंडा येथील जयक्रांती हायस्कूलमध्ये दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम या कार्यक्रमाची सुरुवात गावातील हनुमान मंदिराच्या आवारात उपस्थित असलेल्या गावकरी व मान्यवर प्रतिनिधी सरपंच, पोलिस पाटील, चेअरमन केंद्रप्रमुख जयक्रांती हायस्कूल चे विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे जयक्रांती हायस्कूल तर्फे सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत राष्ट्र गितासह लेझीम टिपऱ्या खेळण्यात आल्या.


यानंतर गांव प्रभात फेरी नंतर सोसायटी त्यानंतर ग्रामपंचायत फरकंडा चार ध्वजारोहण करुन सर्व गावकऱ्यांना जयक्रांती हायस्कूल येथे ध्वजा रोहनास उपस्थित राहाण्याची विनंती करुन जयक्रांती हायस्कूल फरकंडा येथे गावातील सरकारी सेवेत नव्याने भरती झालेले डिगाबर विठ्ठलराव पौळ ,सुदर्शन पौळ यांचा सत्कार त्यानंतर   पत्रकार सुरक्षा समितीच्या नवनिर्वाचित परभणी जिल्हाध्यक्षपदी प्रसाद पौळ यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच बापुराव विठ्ठलराव पौळ. पोलिस पाटील स्वामी, चेअरमन चंद्रकांतजी पुरभाजी पौळ ,विलासराव पौळ, गणेशराव पौळ, जनार्धन पौळ व इतर गावातील प्रतिष्ठित नागरिक यांचा सत्कार करुन जयक्रांती हायस्कूलविद्यालयाचे मुख्याध्यापक  डि.डि. दुधाटे सरांनी ध्वजा रोहन केले. यानंतर गावातील नागरिक याच्या समोर विद्यार्थींचे लेझीम टिपऱ्या व समुह नृत्य यावेळी विद्यार्थ्यांकडून भाषणं देखील सादर करण्यात आले. अशा भव्यदिव्य पध्दतीने प्रजासत्ताक दिन जयक्रांती हायस्कूल फरकंडा येथे मोठ्या थाटामाटा साजरा करण्यात आला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या