🌟अमेरिकेच्या कोर्टाने भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारानुसार तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला दिली मंजुरी🌟
नवी दिल्ली : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या कोर्टाने भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारानुसार तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे.
मुंबई २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकार अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते. २०२० मध्ये भारत सरकारने तहव्वूर राणाच्या अटक, प्रत्यार्पणासाठी अर्ज केला होता. याला जो बायडेन सरकारने त्यावेळी मंजुरी दिली होती आणि तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला होकारही दिला होता. यानंतर हे प्रकरण न्यायालयात होते. त्यानंतर आता जस्टिस जॅकलिन यांनी ४८ पानांचा आदेश देत तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली.
💥मुंबई हल्ल्याच्या कटाची दहशतवादी तहव्वूर राणाला माहिती :-
मुंबई हल्ल्याच्या ४०५ पानी आरोपपत्रात आरोपी म्हणून राणाच्या नावाचाही उल्लेख आहे. त्यानुसार राणा हा 'आयएसआय' आणि 'लष्कर-ए- तोयबा'चा सदस्य आहे. आरोपपत्रानुसार, राणा हल्ल्याचा मुख्य आरोपी डेव्हिड कोलमन हेडली याला मदत करत होता. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ लोकांचा मृत्यू झाला असून ३०० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये काही अमेरिकन नागरिकांचाही समावेश आहे. "तहब्बूर राणाला या कटाबद्दल माहिती होती. तहब्बूर राणाचा लहानपणीचा मित्र डेव्हिड कोलमन हेडली हा 'लष्कर-ए-तोयबा 'मध्ये होता. या दहशतवादी संघटनेसाठी डेव्हिड हेडली काम करत असल्याची माहितीही तहव्बूर राणाला होती. भारतात कट रचत असल्याची माहिती असूनही डेव्हिड हेडलीला तहव्बूर राणाने मदत केली होती," असे कोर्टाच्या आदेशात म्हटले आहे.
0 टिप्पण्या