🌟पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळीच्या गोदापात्रात होणार दक्षिण कोरिया येथील भन्तेजींचा उपसंपदा विधी....!


🌟गोदावरी नदीपात्रात एक नैसर्गिक बेटावर ०१ फेब्रुवारी रोजी सकाळी ०९.०० वाजता होणार उपसंपदा विधी🌟


पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील गोदावरी पात्राची आज शनिवार दि.२५ जानेवारी रोजी अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी पाहणी केली धनगर टाकळी येथील गोदावरी नदीपात्रात एक नैसर्गिक बेट असून या बेटावर दि.०१ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ०९.०० वाजता दक्षिण कोरिया येथील पूज्य भन्ते यांची उपसंपदा विधी अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष डॉ.उपगुप्त महास्थवीर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.


यावेळी श्रीलंका येथील वंदनीय भिक्खू संघाची उपस्थिती राहणार आहे.भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो पाहणीसाठी आले असता धनगर टाकळीचे सरपंच सैनाजी माठे,  उपसरपंच शेख मगदूम, मा.सरपंच नरहरी पाटील साखरे,ग्रा.स. मुकेश ढगे, ग्रा. स. मधुकर ढगे, ग्रा.स. नवनाथ साखरे, सर्वांचे मार्गदर्शक,नेहमीच  सामाजिक कार्यात सहभागी असणारे श्रीकांत हिवाळे सर हे पण सोबत उपस्थित होते ,धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले पप्पू ढगे, चंद्रकांत  ढगे नरहरी ढगे, महिला मंडळ व गावकऱ्यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर उपभोक्त महास्थवीर यांचे स्वागत करण्यात आले.

 दिनांक ०१ फेब्रुवारी २०२५ रोजी उपसंपदा विधीला देश-विदेशातील मान्यवर भन्ते येत असल्यामुळे गावामध्ये स्वच्छता अभियान नदी तीरावर स्वच्छता अभियान साफसफाई स्वागताचे बॅनर शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे  अभिवचन गावकऱ्यांच्या वतीने सरपंच  प्रा.सैनाजी माठे यांनी दिले.गावामध्ये सामाजिक ऐक्य सदभाव पाहून भंतेजींनी समाधान व्यक्त केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या