🌟शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे टोकाची भूमिका घेणार नाहीत - शरद पवार

 


🌟उद्धव यांच्याशी आपली याबाबत चर्चा झाली असल्याचेही यावेळी पवार म्हणाले🌟

पुणे : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले असले तरी ते इतकी टोकाची भूमिका घेणार नाहीत अशी आशा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जेष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्यात काल शुक्रवार दि.२४ जानेवारी २०२५ रोजी व्यक्त केली.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत उद्धव ठाकरे यांनी त्यांचे मत व्यक्त केले असले तरी हा प्रश्न सामोपचाराने सोडवावा असे महाविकास आघाडीतील अन्य पक्षांना वाटत आहे असेही पवार म्हणाले. उद्धव यांच्याशी आपली याबाबत चर्चा झाली आहे, मात्र ते टोकाची भूमिका घेणार नाहीत, अशी आशा पवार यांनी व्यक्त केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या