🌟खासदार बजरंग सोनवणे यांनी एपीआय गणेश मुंडेंची मानवाधिकार आयोगाकडे केली होती तक्रार🌟
बिड : बिड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे यांना वादग्रस्त सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी 'बीड पोलीस प्रेस ग्रुप' या वाट्सॲप ग्रुपवर शनिवार दि.०४ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी एक धमकीवजा पोस्ट केली होती ज्यामुळे पोलीस दलात अक्षरशः खळबळ माजली होती त्यांनी केलेल्या पोस्ट मध्ये 'या खासदाराची चड्डी सुध्दा जागेवर राहणार नाही, मी जर प्रेस घेतली तर' असे लिहीले होते अश्या प्रकारे पोस्ट करणाऱ्या एपीआय गणेश मुंडे यांचा निशाणा नेमका कोणावर आहे आणि मुंडे सारखे पोलीस अधिकारी कोणत्या खासदाराला धमकीची भाषा वापरत आहेत अशी चर्चा कुचर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरु झाली आहे. एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याने असे बेजबाबदार वक्तव्य पोस्ट करणे कितपत योग्य आहे ? असा गंभीर प्रश्न जनसामान्यांतून उपस्थित होतांना पाहावयास मिळत होता.
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग येथे दि.०९ डिसेंबर २०२४ रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली त्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र संतापाची लाट पसरली या हत्येचा तपास आता सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन पातळीवर सुरु झालेला आहे. या हत्येच्या पाठीशी जे राजकीय लोक आहेत त्यांच्याबद्दल जनमाणसात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आ. सुरेश धस, आ. संदीप क्षीरसागर, आ. प्रकाश सोळंके यांच्यासहीत सर्वांनीच आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केलेली आहे. दरम्यान बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करत बीडमधील स.पो.नि.गणेश मुंडे आणि स.पो.नि. दहिफळे या दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली होती त्यामुळे - झख गणेश मुंडे यांची महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावरून पुणे येथे नियंत्रण कक्षात तडका फडकी बदली करण्यात आली......
0 टिप्पण्या