🌟कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिखली अर्बन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सतीश गुप्त हे होते🌟
✍️ मोहन चौकेकर
चिखली – चिखली अर्बन बहुद्देशीय संस्था संचालित चिखली शहरातील अग्रगण्य असलेली शाळा दि. चिखली अर्बन विद्यानिकेतनच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलनचे उद्घाटन “ ऋणानुबंध मातीचे” दिनांक ३० जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री श्री. प्रतापराव जाधव यांची शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिखली अर्बन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सतीशभाऊ गुप्त हे होते.
याप्रसंगी प्रास्ताविक करताना संस्थेचे सचिव डॉ. आशुतोषभाऊ गुप्ता यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दि. चिखली अर्बन विद्यानिकेतन सदैव अग्रेसर असते. अभ्यासासोबतच क्रीडा, संगीत व इतर क्षेत्रातही आपल्या शाळेचे विद्यार्थी अग्रेसर आहेत. शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा सी.बी.एस.ई. बोर्डाने घेतलेल्या परीक्षेत विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा उज्वल यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेतील शिक्षक वृंद अथक परिश्रम करतात. २०१४ मध्ये सुरू झालेली दि. चिखली अर्बन विद्यानिकेतन ही इंग्रजी माध्यमाची शाळा जरी असली तरी इंग्रज तयार करणे हा शाळेचा उद्देश्य नसून विद्यार्थ्यांच्या मनात जाज्वल्य राष्ट्रभक्ती निर्माण करणे हा शाळेचा मुख्य व मूळ उद्देश आहे. प्रत्येक वर्षी सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना संस्कृतीशी जुळवून ठेवणे व आपल्या संस्कृतीबद्दल आपुलकी निर्माण करणे यासाठी शाळेचा सतत प्रयत्न असतो असे सुद्धा सांगितले. स्नेहसंमेलनामुळे मुलांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळतो.
या वेळी कार्यक्रमाचे उद्घाटक केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, श्री. सतीश गुप्ता यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या शाळेने अल्पावधीतच यश प्राप्त करून नावलौकिक प्राप्त केला आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून कल्पकतेने शाळेच्या विकासाकरिता डॉ आशुतोष गुप्ता यांनी कल्पकतेने केलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे आवर्जून सांगितले. शाळेच्या यावर्षीचे स्नेहसंमेलनाची संकल्पना ही विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या मातीविषयी प्रेम आणि आत्मीयतेची भावना निर्माण करेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
देशातील नागरिकांचे प्रकृती परीक्षण कार्यक्रमात जगात भारताचे नाव झाले असून हा जागतिक रेकॉर्ड असून या अभियानाचे सचिव या नात्याने डॉ. आशुतोष गुप्ता यांनी या अभियानाची धुरा सक्षमपणे सांभाळली असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री माननीय प्रतापरावजी जाधव यांनी केले.स्नेहसंमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात रेणुका मातेचे वहन व देवीचे सोंग तसेच गजानन महाराजांची दिंडी या कार्यक्रमाचे आकर्षणाचा मानबिंदू ठरले. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील संत ते सण हा सर्व प्रवास त्यांच्या नृत्य सादरीकरणातून सादर केला विद्यार्थ्यांनी गीता श्लोक संग्रहाचे सामुहिक पठण केले. त्या नंतर रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सतीशभाऊ गुप्त त्याचप्रमाणे विजय कोठारी, रामकृष्णदादा शेटे, प्रेमराज भाला, पंडितराव देशमुख, कैलास भालेकर, विलास घोलप, संस्थेचे उपाध्यक्ष मनोहर खडके, सचिव डॉ. आशुतोष गुप्ता, सहसचिव पुरुषोत्तम दिवटे, दि चिखली अर्बन बहुउद्देशीय संस्थेचे संचालक राजेंद्र शेटे, विश्वनाथ जितकर, पालक संचालिका सौ. ज्योत्स्ना गुप्ता, डॉ. सौ. पूजा गुप्ता, सौ. सुनीता भालेराव, चिखली अर्बन बँकेचे सरव्यवस्थापक शशांक पंधाडे त्याचप्रमाणे शाळेचे प्राचार्य गौरव शेटे इत्यादी मान्यवर व मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या भालके, वेदिका सोनोने, शौर्य शेळके, अंजली पायघन, नैतिक खंडेलवाल, त्रिनभ जाधव इत्यादी विद्यार्थ्यांनी केले. आभार प्रदर्शन विद्यार्थिनी प्रतिनिधी श्रेयसी पाटील हिने केले......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या