🌟पुर्णा शहरात प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित संविधान गौरव सोहळ्यात बोलताना ते म्हणाले🌟
पुर्णा :- जगात संविधानाचे कुठेच सोहळे साजरे केले जात नाहीत,ते भारतात केले जातात ही भारतीय संविधान आणि भारतातील जनतेसाठी अभिमानाची बाब आहे असे गौरवोद्गार भारतीय संविधानाचे गाढे अभ्यासक,अर्थतज्ञ मा.अजित अभ्यंकर यांनी पुर्णा शहरात काल ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर संपन्न झालेल्या २३ व्या संविधान गौरव सोहळ्यात व्यक्त केले ते या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
या संविधान गौरव सोहळ्याचे उदघाटन परभणी जिल्ह्याचे खासदार मा.संजय उर्फ बंडू जाधव यांच्या हस्ते झाले सतत तेवीस वर्षापासून सुरू असलेल्या या गौरव सोहळ्याचे आणि हा सोहळा आयोजित करणाऱ्या गौरव समितीचे तोंड भरून कौतुक केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध आंबेडकरवादी विचारवंत प्रो.डॉ.राजेंद्र गोणारकर हे होते या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात पूज्य भदंत डॉ.उपगुप्तजी महास्थविर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आंबेडकर चौकात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून माजी नगराध्यक्ष प्रा.मोहनराव मोरे यांच्या हस्तें पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी उपसस्थिताना त्रिसरण पंचशील प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी डॉ.विनय वाघमारे,डॉ संदीप जोंधळे,प्राचार्य केशव जोंधळे,डॉ.गंगाधर कांबळे,ॲड.सूर्यकांत काळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती दुसऱ्या सत्रात डॉ.आंबेडकर नगर येथील धाजारोहन भदंत बोधीधम्मा यांचे हस्ते करण्यात आले.त्यानंतर संविधान ग्रंथ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची वाद्यवृंधासह शहराच्या प्रमुख मार्गाने भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.तिचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आला व स्मृतिशेष शहीद विजय वाकोडे विचार मंचावर संविधान सोहळ्यास भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.उद्देशिकेचे वाचन प्रा.अशोक कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो,कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.गोणारकर,डॉ.अभ्यंकर,यांच्या सत्कारानंतर प्रशासकीय आणि सामाजिक सेवेत सातत्याने झटणाऱ्या मान्यवरांचे संविधान ग्रंथाची प्रत,सन्मानचिन्ह,शाल,आणि पुष्पहार देवून सन्मानित करण्यात आले. प्राचार्य मोहनराव मोरे,गटनेते उत्तम खंदारे,दादरावजी पंडित,इंजिनिअर दयानंद सोनकांबळे,पो.नि.विलास घोबाडे, ॲड.रवि गायकवाड,झाकीर कुरेशी,अब्दुल मुजीब अब्दुल हबीब,ज्येष्ठ नगरसेवक अनिल खर्गखराटे,जलील पटेल,धनंजय रणवीर,सकाळचे वृत प्रतिनिधी जगदीश जोगदंड,मिलिंद कांबळे आदींना कार्यक्रमाचे मुख्य संयोजक प्रकाश कांबळे,गौरव समितीचे चक्रवर्ती वाघमारे,गौतम काळे,टी.झेड.कांबळे,श्रीकांत हिवाळे,आणि दिलीप गायकवाड यांच्या हस्ते मानचिन्ह देवून गौरविण्यात आले विशेषत: या कार्यक्रमात शहीद विजय वाकोडे यांच्या पत्नी व मुलीस साडी,शाल व पन्नास हजार रुपये रोख रक्कमेची आर्थिक मदत संविधान गौरव समितीच्या वतीने करण्यात आली.
या कार्यक्रमात बोलताना पुढे अभ्यंकर म्हणाले,'भारतीय संविधान जनतेच्या लढ्यातून जन्माला आले आहे.भारतीय स्वातंत्र्याचा लढा जेव्हढा महत्वाचा होता तेव्हढाच तो लढा या देशातील विषमता,अस्पृश्यता,भांडवलशाही आणि सामाजिक विषमतेची उतरंड नष्ट करण्यासाठीही महत्वाचा होता.असेही प्रतिपादन त्यांनी केले.ते पुढे म्हणाले,हा देश भगवान बुद्धाचा देश आहे तितकाच तो महविरांचा आहे,ज्ञानेश्वर तुकाराम,नामदेव या वारकऱ्यांचाहीआहे ईश्वर नाकारणाऱ्या चार्वकांचाही आहे तसा तो देव माननाऱ्या लोकांचा आहे तसाच तो देव न माननाऱ्या लोकांचाही आहे.हा देश सर्व समावेशक आहे.आणि या सर्वांना बांधून ठेवण्याचे काम भारतीय करते.भारतीय संविधान केंद्रस्थानी आहे.हे सांगताना ते म्हणाले,ब्रिटिशांच्या उत्तेजनाने आणि धर्मांध वृत्तीने भारतातून पाकिस्तानची निर्मिती झाली,पण त्यांना १९५६पर्यंत संविधान तयार करता आले नाही.जे संविधान बनविले गेले ते मंजूर झाले नाही.त्यामुळे पाकिस्तानात चार वेळा मार्शल ला आला.
या उलट भारतीय संविधान केंद्रस्थानी असल्याने पंच्याहत्तर वर्षानंतरही देश अखंडित आहे.असेही प्रतिपादन त्यांनी केले या प्रसंगी गौरव सोहळ्यात संविधानाच्या अनुसंगाने करण्यात आलेल्या ठरवांचे वाचन प्रा.डॉ.आदिनाथ इंगोले यांनी केले प्रो.डॉ.गोणारकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कांहीं महत्वाचे मुद्दे मांडले.भारतीय संविधानाच्या निर्मितीनंतर भारतात चालणारे १९४७चे ब्रिटिशांचे सर्व कायदे भारतीय संविधानाच्या कलम ३९५ नुसार रद्द झाले .आता जनता ही या देशाची सार्वभौम आहे.कोणतेही सरकार व्यक्तीचे नसते.ते जनतेचे असते.देश टिकवायचा असेल तर त्यावर जनतेचा दबाव असणे गरजेचे आहे.या गौरव सोहळ्याचा समारोप राष्ट्रगीताने झाला कार्यक्रमाचे सूत्र संचलन जगदीश जोगदंड यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीकांत हिवाळे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश कांबळे, प्रा.अशोक कांबळे, प्रा.डॉ.आदिनाथ इंगोले,अशोक व्ही.कांबळे,शिवाजी वेडे,गौतम काळे,विजय जोंधळे,मोहन लोखंडे,किशन ढगे सिध्दार्थ भालेराव,विजय बगाटे,कलीम,शाहीर गौतम कांबळे, आतीक,रौफ कुरेशी, भगवान वाघमारे,रमेश बरकुंट त्रिंबक कांबळे,आदिसह अनेक मान्यवरांनी परिश्रम घेतले......
0 टिप्पण्या