🌟राज्यातील सत्ताधारी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 'जनता संवाद'चे आयोजन....‌!

 


🌟यासाठी मंत्रालयासमोर राष्ट्रवादीच्या कार्यालयात राष्ट्रवादीचे नेते जनतेशी संवाद साधणार🌟


मुंबई : राज्यातील सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने आता 'जनता संवाद' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

यासाठी मंत्रालयासमोर राष्ट्रवादीच्या कार्यालयात राष्ट्रवादीचे नेते जनतेशी संवाद साधणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने जतना संवादाचे आयोजन केले आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून महायुतीतील नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. आगामी मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात अजित पवार पक्षानेही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या