🌟बिड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सौंदाना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर दुचाकीला टिप्परने चिरडले...!


🌟सरपंच क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू : अपघात की घातपात ? पोलीस तपास सुरू🌟

बिड :- बिड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातील सौंदाना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे आपल्या दुचाकीवरून शनिवार दि.११ जानेवारी २०२४ रोजी रात्री आपल्या गावाकडून शेतीचे काम आटोपून परळीकडे येत असतांना मिरवट फाट्याजवळ राख वाहतूक करणाऱ्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेत दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला तर सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला सदरील घटना अपघाताची की घातपाताची ? असा प्रश्न उपस्थित होत असून परळी पोलिस दोन्ही बाजूंनी तपास करीत असल्याचे समजते.

परळी येथील औष्णिक वीज केंद्रातून निघणाऱ्या राखेत मोठ्या प्रमाणावर अर्थकारण दडलेलं असल्यामुळे अजूनही राख माफिया बिनधास्त राखेची वाहतूक करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सौंदाना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे शनिवारी रात्री आपल्या गावाकडचे शेतीचे काम उरकून परळी कडे जात असताना मिरवट फाट्याजवळ राख वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्पर क्रमांक एमएच-४४ - २११७ ने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये मोटार सायकल क्र एमएच २३ - ७१२५ चा चक्काचूर झाला तर मोटार सायकल स्वार सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. टिप्पर चालक मात्र टिप्पर घटनास्थळी ठेवून फरार झाला. अपघात झाल्याचे समजताच नागरीक घटनास्थळी दाखल होत नागरीकांनी अपघातग्रस्ताला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सरपंचाला टिप्परने धडक दिल्यामुळे हा अपघात होता की घातपात होता या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या