🌟महाराष्ट्र राज्यातील नाशिक त्र्यंबकेश्वर येथील 'सिंहस्थ महाकुंभ' मेळ्याकरिता सुविधा उपलब्ध करा....!

 


🌟अशा सूचना मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या🌟 

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे सन २०२७ मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील धार्मिक परंपरेचे दर्शन घडावे, यासाठी नाशिक जवळील भागात एक मोठे महाकुंभ तयार करावे. या महाकुंभामध्ये देशातील तसेच राज्यातील मंदिरे,तीर्थक्षेत्रे, सांस्कृतिक वारशाचे भाविकांना दर्शन घेता येईल.

यासाठी नाविन्यपूर्ण सुविधा उभारा अशा सूचना मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या वर्षभराने येणा-या, २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पूर्वचर्चा तसेच तयारीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या