🌟कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार तर प्रमुख मार्गदर्शक पत्रकार जगदीश जोगदंड हे उपस्थित राहणार🌟
पुर्णा - (दि.२४ जानेवारी २०२५) :- पुर्णा येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक शिबिराचे उद्घाटन दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता मौजे आहेरवाडी येथे गावच्या सरपंच श्रीमती शोभा मोरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार तर प्रमुख मार्गदर्शक पत्रकार जगदीश जोगदंड हे उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरामध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरामध्ये बालकांची आरोग्य तपासणी व सकस आहार यावर मार्गदर्शन होणार आहे मसाला गृह उद्योग प्रशिक्षण ,रक्तगट तपासणी शिबिर ,पशु चिकित्सा शिबिर या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तर डिजिटल साक्षरता काळाची गरज ,राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२०, आजचा तरुण आणि उद्योगातील संधी, शेतीविषयक विविध शासकीय योजनांची माहिती ,स्पर्धा परीक्षांचे स्वरूप आणि तयारी,आदी विषयावर तज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत .
तर दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता या शिबिराचा समारोप होणारा असून यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.डॉ.सुरेखा भोसले , अधिसभा सदस्य प्रा .डॉ. विजय भोपाळे, गावच्या सरपंच शोभा मोरे, उपसरपंच शीला खंदारे, पंचायत समिती सदस्य छगनराव मोरे,ग्रामसेवक नामदेव बकान, पोलीस पाटील बालाजी मोरे ,तंटामुक्तीचे अध्यक्ष अनिल खंदारे, मुख्याध्यापक उमाकांत सूर्यवंशी ,शालेय समिती अध्यक्ष विलास मोरे आदी मान्यवर उपस्थित राहणारा असून गावातील प्रतिष्ठित नागरिक ऋषीभाऊ मोरे, शेषराव खंदारे ,बापुराव मोरे, पंडितराव मोरे ,रामराव मोरे, सदाशिवराव मोरे , गौतम कुलदीपके ,गंगाधर मोरे, पुंडलिकराव मोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
तरी या शिबिरास सर्व गावकरी मंडळीनी उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.प्रभाकर सूर्यवंशी,प्रा.डॉ. दीपमाला पाटोदे यांनी केले आहे......
0 टिप्पण्या