🌟असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे यांनी दिली🌟
मराठी पत्रकार परिषदेच्या सेलू येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तालुका अध्यक्ष पत्रकार संघ मेळावा व आदर्श पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे यांनी दिली आहे.
या बाबत माहिती अशी की दिनांक 1 फेब्रुवारी 25 रोजी सेलू येथे मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळा व राज्यातील 256 तालुक्यातील तालुका अध्यक्षांचा मेळावा येथील साई नाट्य मंदिरात होणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून परिषदेचे सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखाली परभणी व सेलू येथील पत्रकारांनी उर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची सेलू येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले असता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ते निमंत्रण स्वीकारून आपण सेलू येथे कार्यक्रम होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला व मेळाव्यास आपण उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभू दिपके, कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर, राजू हटेकर, जिल्हा सरचिटणीस मोहम्मद इलियास, सेलू तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल, कांचन कोरडे, मोहसीन अहमद, डिजिटल मीडियाचे तालुका अध्यक्ष सतीश आकात, अशोक अंभोरे ,संजय मुंडे आदी उपस्थित होते.......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या