🌟प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती भवनात आमंत्रित शेतकरी रत्नाकर ढगे यांचा कुलगुरू मा.प्रा.डॉ.इन्द्र मणि यांचे हस्ते विशेष सत्कार....!


🌟कुलगुरु मा.प्रा.डॉ.इन्द्र मणि यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला🌟

परभणी :- परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेतुन कार्य करत असल्यामुळे शेतकऱ्यांना केंद्रीत ठेऊनच संशोधनाची आणि विस्ताराची दिशा ठरवत असते. याचा लाभ मराठवाड्यांतील अनेक शेतकरी घेत आहेत. विद्यापीठ खरीप,रब्बी व माहिला मेळाव्यासह महिन्यांच्या दुसऱ्या बुधवारी माझा एक दिवस बळीराजा सोबत हा उपक्रम तसेच दर मंगळवारी आणि शुक्रवारी सायंकाळी ७.०० वाजता ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषि संवाद नियमीत राबवत असुन याचे ६० भाग पुर्ण झाले आहेत. याबरोबर राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमाचे आयोजन करत असते. या सर्व कार्यक्रमात मराठवाडयांतील शेतकऱ्यांचा उत्फुर्त प्रतिसाद असतो. 

या शेतकऱ्यांतील नांदेडच्या लोहा तालुक्यातील मौजे सायळा येथील शेतकरी श्री रत्नाकर गंगाधर ढगे हे शेतकरी नियमित विद्यापीठाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवितात तसेच त्यांनी सेंद्रिय शेती प्रकल्पाद्वारे २०२२-२३ मध्ये आयोजीत तीन दिवशीय व २०२३-२४ मध्ये आयोजित पाच दिवशीय प्रशिक्षणातुन तसेच जैव उर्जेवर आधारीत एक दिवसीय कार्यशाळेतुन सेंद्रिय शेतीच विशेष प्रशिक्षण घेतले व त्याप्रमाणे सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली. त्यांना मिळालेले ज्ञान त्यांनी स्वत:पुरतेच ठेवले नाही तर इतर शेतक­यांना देऊन विद्यापीठाच्या विस्तार कार्यात सहभाग नोंदविला. ते शेतीमध्ये आणि शेतक­यासाठी विविध नाविन्य पुर्ण कार्यक्रम राबवितात. यांची दखल घेऊन त्यांना दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात स्वागतासाठी बोलवण्यात आले आहे. त्यांच्या शेती व्यवसायातील जडन घडणी मध्ये विद्यापीठाचे कुलगुरु मा.प्रा.(डॉ) इन्द्र मणि यांच्या नेत्वृत्वाखालील सर्व शास्त्रज्ञांचा मोलाचा वाटा असल्यामुळे त्यांनी कुलगुरु मा.प्रा.(डॉ) इन्द्र मणि यांची दिनांक १० जानेवारी रोजी भेट घेऊन कृतद्यनता व्यक्त करुन आभार मानले.

यानिमित्त श्री रत्नाकर गंगाधर ढगे यांचा विद्यापीठामध्ये कुलगुरु मा.प्रा.(डॉ) इन्द्र मणि यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी माननीय कुलगुरु म्हणाले की, श्री रत्नाकर गंगाधर ढगे यांना मिळालेला सन्मान  हा सर्व शेतकऱ्यांच्या शेतीविषयी असलेल्या निष्ठेचे प्रतिक आहे. हा सन्मान म्हणजे मराठवाडयातील सर्व शेतक­यांचा सन्मान आहे. भविष्यात मराठवाडयातील अनेक शेतकऱ्यांना हि संधी लाभावी अशी इच्छा व्यक्त केली.या वेळी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ स्मिता सोलंकी, डॉ अनंत गोरे, डॉ प्रविण कापसे,पपिता गौरखेडे  प्रगतीशिल शेतकरी पंडीतराव थोरात, जनार्धन आवरगंड, प्रकाश हरकळ, रामेश्वर साबळे, विजय जंगले, राजेंद्र ठोकर, आदी उपस्थित होते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या