🌟राज्यात व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत १४ रुपयें ५० पैशाची घसरण......!

 


🌟'खोदा पहाड निकला चुहा' घरगुती १४ किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही🌟


मुंबई :- राज्यातील व्यवसायिक गॅस सिलिंडर वापरकर्त्यांसाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आनंदाची बातमी असून जवळपास ६ महिन्यांनंतर घरगुती नव्हे तर व्यवसायिक सिलिंडरच्या दरात मोठी घसरण झाली आहे व्यवसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात १४.५० रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे.

व्यावसायिक सिलिंडरसाठी म्हणजेच १९ किलो एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली असली तरी घरगुती वापराच्या १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. व्यावसायिक सिलिंडरबद्दल बोलायचे झाले तर राजधानी दिल्लीत किंमती कमी झाल्यानंतर आता १८०४ रुपयांना मिळत आहे. आधी१८१८.५० रुपयांना मिळत होता. तेल विपणन कंपन्यांनी सिलिंडरचे दर कमी केले आहेत. १ जानेवारी २०२५ पासून एलपीजी सिलिंडर १४.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर कमी केले आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या