🌟परभणी येथील हजरत सय्यद शहा तूराबुल हक रहैं यांच्या ऊर्साची तारीख व वेळ वाढवावी यासाठी निवेदन.....!


🌟प्रशासनाने पंधरा दिवसाचा हा उरूस चालू राहू देण्याची परवानगी द्यावी अशी मागणी🌟


परभणी :- हिंदू मुस्लिम समाजाच्या एकतेचे प्रतिक म्हणून असणाऱ्या परभणीतील हजरत सय्यद शहा तुराबुल हक्क रहे. अर्थात तुरीतपीरबाबा यांचा उरूस दरवर्षी आयोजित केला जातो ही उर्सची 118 वर्षाची परंपरा आहे हिंदू व मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणून ओळख असलेल्या आणि इतरही धर्मियांचे श्रद्धास्थान म्हणून संपूर्ण महाराष्ट्र सह देशात मानणारे अनेक भाविक आहेत. 


उर्सच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रासह बाहेर राज्यातून येथे व्यापारी येत असतात पंधरा दिवस उरूस भरवला जातो परंतु यंदा हा उरूस 2 फेब्रुवारी पासून ते 10 फेब्रुवारी पर्यंत म्हणजे आठ दिवस भरविण्यात येण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली आहे या निर्णयाच्या विरोधात विविध सामाजिक संघटना तसेच व्यापारी संघटनेच्या वतीने आज दिनांक 23 जानेवारी रोजी निवेदन देण्यात आली आहे, सदरील निवेदनात असे सांगण्यात आले आहे की या उर्सच्या माध्यमातून छोटा मोठा व्यवसाय  करणाऱ्या व्यवसायिकांना रोजगार मिळत असतो त्यासोबतच शासनाला सुद्धा याचा महसूल मिळाल्याचा फायदा होतो, पण यंदा आठ दिवसाचा हा उरूस भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ज्यामुळे खूप कमी कालावधी यामध्ये व्यापाऱ्यांना मिळणार आहे त्या मुळे मोठे आर्थिक नुकसान त्यांचे होईल आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात भावी भक्त सुद्धा येथे येत असतात त्यांना सुद्धा दर्शनासाठी संधी मिळत असते. प्रशासनाने पंधरा दिवसाचा हा उरूस चालू राहू देण्याची परवानगी द्यावी अशी विनंती या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

सदरील निवेदनावर कौसर भाई, अब्दुल्ला राज, सलीम इनामदार, मोहम्मद इब्राहिम, शेख इब्राहिम,मोहम्मद नईम, कौसर हुसेनी, सय्यद मोहीयोद्दीन, सुदर्शन काळे,मोहम्मद शफी,बेलदार अजहर शेख,शेख इफ्तेखार,किरण तळेकर इत्यादींच्या स्वाक्षरी आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या