🌟पुर्णेतील बौद्ध विहाराच्या प्रांगणात आयोजित धम्म परिषदेत बोलताना जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर म्हणाल्या🌟
पुर्णा (दि.३१ जानेवारी २०२५) :- भगवान बुद्धांनी जगाला अहिंसा करूणा आणि शांतीचा संदेश दिला आहे त्या विचाराची खरी गरज आज आहे असे प्रतिपादन परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले पुर्णा येथील बुद्ध विहाराच्या प्रांगणात डॉ.बी.आर.आंबेडकर स्मारक समिती व बुद्ध विहार समितीच्या वतीने दोन दिवशीय २२ व्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी धम्म परिषदेच्या अध्यक्ष स्थानी लेह लडाख येथील भदंत संघसेना महाथेरो तर उदघाटक म्हणून दक्षिण कोरिया येथील बुद्धिष्ठ कोरियन विद्यापीठाचे कुलगुरू डॉलीचि लेन दक्षिण कोरियाचे भदंत थेर इन चांग व्यु स्टॅझिन जॉय लेह लडाख बॉलीवूड अभिनेता गायक फोन्सोक लडाखी लेह लडाख भदंत करुणानंद महाथेरो भदंत प्राडॉ यश काश्यपायन महाथेरो भन्ते शरणानंद महाथेरो भन्ते डॉइंदवेश महाथेरो भन्ते ज्ञानरक्षित थेरो भन्ते पयानंद थेरो भन्ते बोधीधम्मा भन्ते पंयाबोधी थेरो भन्ते धम्मशिल थेरो भन्ते पंयारत थेरो भन्ते शिलरल भन्ते संघरत्न भन्ते संघपाल भन्ते सुभूती थेरो भन्ते प्रा सत्यपाल महाथेरो भन्ते धम्मज्योती थेरो भन्ते धम्मबोधी भन्ते पंयानंश भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांच्या सह श्रामणेर संघ प्रमुख उपस्थिता मध्ये पालकमंत्री मेघना बोर्डीकर सिद्धार्थ हत्तीअंबीरे प्राचार्य मोहन मोरे डॉ एसपी गायकवाड ॲड महेंद्र गायकवाड प्रकाश कांबळे उत्तम खंदारे मुकूंद भोळे ॲड हर्षवर्धन गायकवाड दादाराव पंडित धम्मा जोंधळे अनिल खर्गखराटे यादव भवरे मितीन साळवे आरके गायकवाड भिमराव सावधकर केशव कांबळे प्राअशोक कांबळे कॉ अशोक कांबळे यशवंत उबारे भिमराव वायवळ अशोक धबाले मुकूंद पाटील डॉ.सुरेश वाघमारे गौतम भोळे मधूकर गायकवाड आदि उपस्थित होते.
या निमिताने सकाळी डॉ आंबेडकर चौक येथे धम्म ध्वजाचे ध्वजारोहण फोन्सोक लडाखी यांच्या हस्ते करण्यात आले डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले त्यानंतर १० वा बुद्ध विहार येथे धम्म ध्वजाचे ध्वजारोहण भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले त्या नंतर बुद्ध विहारात भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेबाच्या प्रतिमांना अभिवादन करून त्रिशरण पंचशिल देण्यात आले त्यानंतर दुपारी १२ः३० वा डॉ बाबासाहेब सांस्कृतिक सभागृह आंबेडकर नगर येथे धम्म ध्वजाचे ध्वजारोहण भिक्खु सं घसेन महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा चांदीच्या रथातून भिक्खु संघ व श्रमणेर संघाच्या बौद्ध उपासक उपासिका च्या उपस्थित वा दयवृंद लेझीम पथक सहित शहराच्या मुख्य मार्गावरून धम्म मिरवणूक काढून ह्या मिरवणूकीचे रूपांतर धम्मपरिषदे करण्यात आले . भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर व ४२ व्या स्मृति दिनाच्या निमिताने निर्वाण पदस्थ उपाली थेरो यांच्या प्रतिमांना अभिवादन करून त्रिशरण पंचशिल ग्रहण करण्यात आले मान्यवरांचे भिक्खु संघाचे स्वागत सत्कार करण्यात आले यावेळी बोर्डीकर पुढे म्हणाल्या की आज जगात युद्ध पेटत आहेत परंतू भारतात मात्र शांत आहे भारताला भगवान बुद्धाचे विचार आहेत याला आपण जपले पाहिजे या विचारावर चालले पाहिजे बाबा साहेबांनी दिलेल्या संविधानात महिलांना दिलेल्या अधिकार व हक्क यामुळे मी पालकमंत्री या पदावर आहे पूर्णेच्या बुद्ध विहार व परभणी जिल्हयातील बौद्ध विहाराच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न शिल राहिल आपले सर्व मागण्या पूर्ण करण्यात येतील धम्म परिषदाची गरजेच्या आहेत त्यांच्या साठी जे मदत लागेल ती करणार असल्याचे अभिवचन यावेळी दिले त्यांचा बुद्ध विहार समितीच्या वतीने शाले पुष्पहार स्मृती चिन्ह स्मरणिका देऊन स्वागत सत्कार करण्यात आले यावेळी लूम्बीनी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले कार्यकमाचे सुत्रसंचालन भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांनी केले यावेळी हजारो बौद्ध उपासक उपासिकाची उपस्थिती होती.....
0 टिप्पण्या