🌟महायुतीच्या वतीने पाथरीत आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात बोलताना राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर म्हणाल्या🌟
परभणी (दि.११ जानेवारी २०२५) : परभणी जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून विकासाचा अनुशेष राहिला आहे तो भरून काढण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत अशी ग्वाही राज्यमंत्री सौ.मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पाथरीत आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात दिली.
पाथरी शहरात महायुतीच्या वतीने काल शुक्रवार दि.१० जानेवारी रोजी राज्याच्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर व नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांचा नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी त्या बोलत होत्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आ. हरिभाऊ लहाने तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष भावना नखाते, शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे, सोनपेठचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, मानवतचे माजी नगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड, मानवत बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, सोनपेठ बाजार समितीचे सभापती दशरथ सूर्यवंशी, डॉ. केदार खटिंग तर व्यासपीठावर माजी जि. प. सभापती मीरा टेंगसे, सत्कार समितीचे अनिल नखाते, संजय रणेर, भाजपचे राज्य प्रवक्ते डॉ. उमेश देशमुख, दादासाहेब टेंगसे, सुभाष आंबट, बाळासाहेब कोल्हे, तालुकाध्यक्ष पांडुरंग नखाते, गजानन धर्मे, अजिंक्य नखाते मुंजाभाऊ बुलंगे, विजय कोल्हे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना, ऊर्जा, आरोग्य, पाणी पुरवठा, कृषी अशी महत्वाची खाती आपल्याकडे असल्याने अनेक कामे करायची असून यापुढे जिल्ह्याच्या विकासाला कधीही निधी कमी पडणार नाही, असा विश्वास व्यक्त करीत आत्मनिर्भर योजनेचा लाभ महिला व तरुणांनी घेतला पाहिजे, असे आवाहनही बोर्डीकर यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचलन महायुतीचे समनव्यक संजय कुलकर्णी यांनी केले. या सत्कार सोहळ्यास तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्याचा विकास करणे आमची जबाबदारी - विटेकर
जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून विकासात मागे पडला आहे. जिल्ह्याला मेघनादीदींच्या रूपाने मंत्रीपद मिळाले असल्याने व केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार असल्याने आता फक्त जिल्ह्याचा विकास करायचा आहे आणि तो करणे आमची जबाबदारी आहे. भविष्यात बेरोजगारी व शेतकर्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करायचे आहे, आमदार राजेश विटेकर यांनी यावेळी म्हटले. पुढे बोलताना विटेकर यांनी, महायुतीत राहून गद्दारी करणार्यांना पुन्हा पक्षात कसे घेतात, असा संतप्त सवाल उपस्थित करीत सईद खान यांच्यावर जोरदार टीका केली. काल राजकारणात आलेला आम्हाला नैतिकतेच्या गोष्टी शिकवत आहे. जिल्ह्यात अनेक ज्येष्ठ मंडळी आहेत मात्र ते कधीही आपला स्तर सोडून एकमेकांवर टीका करत नाहीत. परंतु, या माणसाला पैशाची इतकी मस्ती आली की, प्रत्येक गोष्टीला तो पैशातच बोलत असतो. त्यामुळे आपण आगामी नगरपालिकेची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविणार आहोत, असेही विटेकर यांनी म्हटले.......
0 टिप्पण्या