🌟महाराष्ट्र राज्यातील ६ लाख शेतकऱ्यांना मिळाली ओळख....!

 


🌟कृषी सहायकांविना तलाठ्यांनीच या योजनेची अंमलबजावणी सुरू केली🌟

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ग्रिस्टॅक योजनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. कृषी सहायकांविना तलाठ्यांनीच या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे राज्यात आतापर्यंत ६ लाख ८८ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, त्यातील ६ लाख शेतकऱ्यांना स्वतःची ओळख मिळाली आहे. 

केंद्र व राज्य सरकारच्या कृषीविषयक योजनांचा लाभघेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक यापुढे बंधनकारक केला आहे. यासाठी ग्रिस्टॅक या योजनेत नावनोंदणी करणे शेतकऱ्यांना अनिवार्य आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. परंतु, कृषी सहायकांनी टाकलेल्या बहिष्कारानंतर या योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, आता कृषी सहायकांविनाच ही योजना तलाठ्यांनी सक्षमपणे राबविण्यास सुरुवात केली असून, राज्यात आतापर्यंत ६ लाख ८८ हजार १०४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, ६ लाख १ हजार २०८ शेतकऱ्यांना क्रमांक मिळाला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या