🌟पुर्णा-नांदेड राज्य मार्गावरील रेल्वे उड्डाणपूल व पर्यायी सिमेंट रस्त्यांचे निकृष्ट बांधकाम देतेय भविष्यातील धोक्याचे संकेत....!


🌟भारतीय रेल्वे विभागाच्या  वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : गुत्तेदारांकडून अंदाजपत्रकाला मुठमाती🌟 

🌟रेल्वे उड्डाणपूलासह आसपासच्या पर्यायी सिमेंट रस्त्यांच्या बांधकामासाठी निकृष्ट बांधकाम साहित्याचा वापर🌟 


पुर्णा (विशेष वृत्त - चौधरी दिनेश) :- पुर्णा-नांदेड राज्य महामार्गावरील हिंगोली रेल्वे गेट परिसरात मागील पाच वर्षांपूर्वी रेल्वे उड्डाणपूलाच्या बांधकामाला महारेल (एमआयआरडीसी) अंतर्गत दि.२७ ऑगस्ट २०१९ रोजी सुरुवात झाली अगदी संथगतीने सुरू असलेल्या या रेल्वे उड्डाणपूलाचे दर्जाहीन बांधकामाला जवळपास साडेपाच वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर देखील अद्याप पर्यंत रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम तर पुर्ण झालेच नाही परंतु सर्वात महत्त्वाचे नसून कासवगतीने सुरू असलेल्या या उड्डाण पुलाच्या बांधकामाची बाब म्हणजे तब्बल ९६ कोटी ६६ लाख ३५ हजार ७५७ रुपयांच्या म्हणजे जवळपास शंभर कोटींच्या विकासनिधीतून होणाऱ्या या रेल्वे उड्डाणपूलासह आसपासच्या लाखों रुपयांच्या विकासनिधीतून होणाऱ्या सिमेंट रस्त्यांच्या निकृष्ट व दर्जाहीन बांधकामाकडे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंधातून सपशेल दुर्लक्ष होत असल्याने या रेल्वे उड्डाणपूलाचे टेंडर घेतलेल्या एम/एस डिसीएस - पि.व्ही.राव (जेव्ही),सब गुत्तेदार गॅलकॉन इन्फ्रॉस्ट्रक्चर प्रा ली हैदराबाद,महाराष्ट्र रेल इन्फ्रॉस्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन ली या कंपन्यांनी रेल्वे उड्डाणपूल बांधकामासह आसपासच्या पर्यायी सिमेंट रस्त्याची देखील वाट लावल्याचे पाहावयास मिळत आहे.


पुर्णा-नांदेड राज्य महामार्गावरील हिंगोली रेल्वे गेट परिसरात निर्माणाधिन असलेल्या रेल्वे उड्डाणपूलाच्या पिल्लरसह स्लॅबच्या बांधकामासाठी क्रेशरवर आग्नेय खडक,ग्रॅनाइट किंवा काळ्या मजबूत दगडांवर प्रक्रिया करून त्यापासून बनवलेल्या कृत्रिम वाळू अर्थात क्रश सॅंडचा वापर करणे अंदाजपत्रका नुसार बंधनकारक असतांना संबंधित रेल्वे उड्डाणपूल बांधकाम कंपन्यांनी पुर्णा-गोदावरी नदीपात्रातील निकृष्ट माती युक्त लाखों ब्रास अवैध चोरट्या वाळूचा वापर करीत बांधकाम केल्याने सदरील रेल्वे उड्डाणपूलाचे निकृष्ट व दर्जाहीन बांधकाम भविष्यात फार मोठ्या धोक्याचे संकेत देत आहे याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे रेल्वे उड्डाणपूलाच्या आसपास आरामशीन परिसराच्या दोन्ही भागात तसेच गजानन महाराज मंदिर ते हयात नगर रोड परिसरात बांधण्यात येत असलेल्या जवळपास दिड ते पौनेदोन कोटी रुपयांच्या विकासनिधीतून होणारें सिमेंट रोडचे बांधकाम देखील अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे.


सदरील रस्त्याचे काम करण्यापूर्वी मजबूतीकरणासाठी खोदकाम करुन त्यात क्रश सॅंडचा वापर करणे बंधनकारक असतांना संबंधित गुत्तेदार त्यात मुरूम व खोदकाम केलेल्याच मटेरियलचे पुनर्भरण करीत असून नियमानुसार सिमेंट रस्त्याचे कामात स्टिलचा वापर न करता दिसत्या भागात दिड दोन फुटांचे स्टिल अर्थात गजाळीचे तुकडे टाकून वरिष्ठ अधिकारी तसेच प्रसारमाध्यमांच्या डोळ्यात धुळ झोकण्याचे काम करीत असुन अंदाजपत्रकानुसार सदरील सिमेंट रोडची रुंदी जवळपास १२ फुटांच्यावर असणं आवश्यक असतांना संबंधित सिमेंट रस्ता बांधकाम गुत्तेदार रस्त्याची रुंदी साडेअकरा फुटाचीच करीत असून सदरील सिमेंट रस्ते रुंद दिसावे याकरिता आसपास खोदकाम केलेल्या वेस्ट मटेरियलचा वापर करीत असल्याचे पाहावयास मिळत असून या अरुंद व दर्जाहीन सिमेंट रस्त्यांची अल्पशा कालावधीत संपूर्णतः वाट तर लागणारच त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे भविष्यात या सिमेंट रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढणार यात तिळमात्र शंका नाही रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह रेल्वे बांधकाम विभागाच्या कॉलेटी कंट्रोल विभागाने वेळीच लक्ष देऊन रेल्वे उड्डाणपूल व आसपासच्या निकृष्ट व दर्जाहीन सिमेंट रस्त्यांच्या कामांची सखोल चौकशी करावी व भविष्यात होणारें दुष्परिणामांना प्रतिबंध लावावा अशी मागणी जनसामान्यांतून होत आहे.......




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या