🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या.....!


🌟भाजप हा जुमला पक्ष,यापुढं त्यांच्यासोबत जाणार नाही - महादेव जानकर ; छोट्या पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन🌟

💫संतोष देशमुख हत्याप्रकरणात कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन, मराठा समन्वयकांशीदेखील चर्चा ;'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती, खंडणीखोर आणि खून प्रकरणातील आरोपी एकच' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा 

💫सरपंच संतोष देशमुखांना महिनाभरापूर्वी वाल्मिक कराडची धमकी; अश्विनी देशमुखांचा सीआयडीला महत्त्वाचा जबाब ; धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर, मनोज जरांगेंशी फोनवरुन बातचीत, दोघांच्या डोळ्यात घळाघळा पाणी ; धनंजय देशमुखांच्या पाठोपाठ सरपंचांची लेकही पाण्याच्या टाकीवर चढली, पोलीस हतबल; फायरब्रिगेडची गाडी बोलावली! 

💫कॅबिनेट मंत्रीधनंजय मुंडेंच्या बंगल्यावर 12 डिसेंबरला वाल्मिक कराड अन् पोलीस अधिकाऱ्याची बैठक; बजरंग सोनवणेंचा खळबळजनक आरोप ; कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे, आमदार संदीप क्षीरसागरांची मागणी 

💫राज्यातील तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, शिवसेनेच्या विनायक राऊतांचा दावा, ठेकेदारांच्या फायद्यासाठी सरकारचे प्रयत्न असल्याचा आरोप ; नियमात न बसणाऱ्यांनी स्वत:हून नावं काढा,अन्यथा दंडासह वसुली होणार - छगन भुजबळ  

💫मुंबईत राजकीय घडामोडींना वेग,संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, तब्बल 20 ते 25 मिनटे चर्चा !

💫 भाजप हा जुमला पक्ष, यापुढं त्यांच्यासोबत जाणार नाही - महादेव जानकर ;  छोट्या पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन 

💫नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतली पोलीस अधिकाऱ्यांची बैठक, मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत देण्याची घोषणा ; मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं ; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग ; सोशल मीडियावर स्टेटस टाकलं अन् पुढच्या काही क्षणांत भीषण अपघात लोखंडी सळ्या अंगात शिरल्याने  तरुणांनी जागेवरच प्राण सोडला 

💫ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये मोठी फूट; नागपूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश ;छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून 5 नक्षलवाद्यांचा खात्मा; ठार झालेल्यांमध्ये 2 महिला नक्षलींचा समावेश 

💫ठाण्यात अल्पवयीन मुलाने भरधाव टेम्पो चालवत 2 रिक्षांना उडवलं! चालकाचा मृत्यू, तर 2 जण जखमी 

💫आजपासून कुंभमेळ्याला सुरूवात! ई-पास काढावा लागेल , ऑनलाइन अर्ज करा ; राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण ; काश्मीर खोऱ्यातील 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा 

💫बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकली,पुढचं लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफी,ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, दुखापतग्रस्त कॅप्टन पॅट कमिन्सबाबत संभ्रम कायम ; विजय हजारे ट्रॉफीच्या सेमीफायनलसाठी 4 संघ निश्चित हरियाणा विरुद्ध कर्नाटक आणि विदर्भ विरुद्ध महाराष्ट्र भिडणार

💫खुशबखर! सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार, संजय शिरसाट यांनी दिले संकेत; इतरही जाचक अटी शिथिल होणार

💫सिडकोसाठी डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, कॅबिनेट मंत्री सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच! 

पुण्याच्या फर्ग्युसन रोडवर वाल्मिक कराडची प्रॉपर्टी, एकाच बिल्डिंगमध्ये सहा अलिशान ऑफिस, आता कर्दनकाळ ईडीची एन्ट्री होणार ?

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या