🌟यावेळी राज्याच्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी देखील शहिदी समागम कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती लावली🌟
परभणी (दि.०१ जानेवारी २०२४) - परभणी शहरातील श्री गुरु साहेबजी गुरुद्वारा येथे सिख धर्माचे दहावे गुरु दशमेशपिता साहीब श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज यांचे सुपुत्र चार साहीबजादे यांचा शहीदी समागम संपन्न झाला यावेळी हजुरी जत्था हजुरी कथाकार तख्त सचखंड हजूर साहेब नांदेड यांनी अखंड पाठासह शहीद चार साहीबजादे यांच्यावर आधारित किर्तन दरबाराच्या माध्यमातून परभणी येथील बालकांना चार साहिबजादे यांची शौर्यगाथा स्मरण करून दिली.
यावेळी परभणी येथील श्री गुरु साहेब गुरुद्वाराचे सर्व सेवादार आणी संपूर्ण गुरसिख समुदायाने अत्यंत धार्मिक सेवाभाव आणी श्रध्दापुर्ण भावनेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी लंगर प्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी राज्याच्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी देखील श्री गुरु साहेबजी गुरुद्वारात नतमस्तक होऊन चार साहीबजादे शहिदी समागम कार्यक्रमास आवर्जून हजेरी लावून शहिद चार साहीबजादे यांना अभिवादन केले यावेळी गुरसिख समुदायाच्या वतीने त्यांचा शिरोपाव व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला......
0 टिप्पण्या