🌟मुंबईतील विलेपार्लेत बनावट सोन्याची लगड देऊन सराफा व्यापाऱ्याची फसवणूक.....!


🌟फसवणूक प्रकरणी सुरेश आणि अशोक या दोन भामट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल🌟 

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले येथे बनावट सोन्याची (बोगस) लगड देऊन एका सराफा व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी दोन भामट्यांच्या विरोधात विलेपार्ले पोलिसांनी रितसर गुन्हा दाखल केला आहे. 

बनावट सोन्याची लगड देऊन फसवणूक केल्या प्रकरणातील दोन आरोपींची नावं सुरेश आणि अशोक अशी असून या दोघांनी १९ लाखांचे दागिने घेऊन बोगस लगड देऊन पलायन केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. वयोवृद्ध तक्रारदार विलेपार्ले परिसरात राहत असून याच परिसरात त्यांचे एक ज्वेलर्सचे दुकान आहे. गेल्या वर्षी त्यांची दोन्ही आरोपीशी ओळख झाली होती. त्यांनी त्यांच्याकडून एक सोन्याची चैन घेऊन त्यांना सोन्याची लगड दिली होती त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे आणखीन काही दागिन्यांची ऑर्डर दिली होती. या दागिन्यांच्या मोबदल्यात त्यांना सोन्याची लगड देण्याचे आश्वासन दिले होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या